आणखी एक घोटाळा ! ७ हजार नागरिकांची ७०० कोटींना फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल

कंपनीने दिलेली आश्वासन पूर्ण केली, पण त्यानंतर गुंतणूकदारांचे पैसे थकण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण आलं.

आणखी एक घोटाळा ! ७ हजार नागरिकांची ७०० कोटींना फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल
SHARES

भारतात मालमत्ता गुंतवणुकीच्या नावाखाली आजपर्यंत अनेक उद्योगपतींनी कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याची उदाहरणे ताजी असताना. राज्यातील तब्बल ७ हजार गुंतणूकदारांची ७०० कोटी रुपयांना फसवणूक केल्याची धक्कादायकबाब उघडकीस आली आहे. शेती व बिगरशेती जमिनीत गुंतवणुकीबाबत आमिष दाखवून फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्रातील पुणे व मुंबई, कर्नाटकातील बंगळुरू, गोवा व इतर राज्यांतील नागरिकांचाही समावेश आहे. काही गुंतवणूकदार अनिवासी भारतीयही असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बंगळुरू येथील कंपनीच्या नऊ संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा ः- शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश!

शेती व बिगरशेती जमिनीत एक्सपॅट प्रोजेक्टस् अॅण्ड डेव्हलपमेंट प्रा. लि. कंपनीने नागरिकांना गुंतणूक करण्यास सांगितली होती. या गुंतवणूकीमागे चांगला परतावा मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. गुंतवणूकदारांना ७० टक्के रक्कम हप्त्यांनी भरायची होती. तर ३० टक्के रक्कम नोंदणी करून भरण्याची योजना आणली होती. जर कंपनी गुंतणूकदारांना प्लॉट देण्यास असमर्थ ठरली, तर उर्वरित रक्कम अतिरिक्त दोन टक्के व्याजावर परत करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. कंपनीने दिलेली आश्वासन पूर्ण केली, पण त्यानंतर गुंतणूकदारांचे पैसे थकण्यास सुरुवात झाली.  त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे  हे प्रकरण आलं.  पोलिसांच्या प्राथमिक तपासात २०१३ पासून ७ हजार गुंतणूकदारांचे ७०० कोटी रुपये थकल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा ः- मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

या प्रकरणी कंपनीच्या नऊ संचालकांविरोधात कलम ४०६, ४०९, ४२०, १२० (ब), ३४ यांसह महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याच्या (एमपीआयडी) कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपींविरोधात लुक आऊट नोटीसही जारी केलेली आहे. ही कंपनी बंगळुरू येथील नोंदणीकृत आहे. तिची बंगळुरू, मुंबई व पुण्यात कार्यालये आहेत. पुण्यातही या नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे कळते. या गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्रातील पुणे व मुंबई, कर्नाटकातील बंगळुरू, गोवा व इतर राज्यांतील नागरिकांचाही समावेश आहे. काही गुंतवणूकदार अनिवासी भारतीयही असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गुंतवणुकीच्या पैशांतून रायगड जिल्ह्यात जागा खरेदी करण्यात आल्याचा संशय आहे. तरी कंपनीने हा पैसा कोठे गुंतवला आहे आहे, याबाबत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा