म्हणून आईनं 'त्याला' झाडाला बांधलं, पोलिसांनी केली सुटका

मुलांना शिस्त लागावी, त्याचं करिअर घडावं म्हणून पालक कधी डोळ्यांच्या धाकानं, तर कधी मारून मुटकून त्यांना वठणीवर आणतात. आपल्यापैकी अनेकांनी पालकांच्या हाताचा प्रसाद मनमुरादपणे चाखला असंल, पण काही वेळेस रागाच्या भरात पालकांकडूनही अजानतेपणाने अशा काही चुका घडतात, की त्यामुळे त्यांना घरातल्यांकडूनच नव्हे, तर चक्क पोलिसांकडूनच समज देण्याची वेळ येते.

म्हणून आईनं 'त्याला' झाडाला बांधलं, पोलिसांनी केली सुटका
SHARES

आपल्या मस्तीखोर मुलाला आवर घालायचा कसा? मैदानाकडे वळणारे पाय रोखून त्याला अभ्यासाला बसवायचं कसं? अशा विवंचतनेत सापडलेले असंख्य पालक आपल्या शेजारीपाजारी किंवा आपल्याच घरात दिसून येतात. मुलांना शिस्त लागावी, त्याचं करिअर घडावं म्हणून पालक कधी डोळ्यांच्या धाकानं, तर कधी मारून मुटकून त्यांना वठणीवर आणतात. आपल्यापैकी अनेकांनी पालकांच्या हाताचा प्रसाद मनमुरादपणे चाखला असंल, पण काही वेळेस रागाच्या भरात पालकांकडूनही अजानतेपणाने अशा काही चुका घडतात, की त्यामुळे त्यांना घरातल्यांकडूनच नव्हे, तर चक्क पोलिसांकडूनच समज देण्याची वेळ येते.

अशीच एक घटना जुहू परिसरात सोमवारी घडली असून एका आईने आपल्या मुलाला रागाच्या भरात नग्न करून झाडाला बांधून ठेवल्याने या लहानग्याची सुटका करण्यासाठी थेट पोलिसांनाच धाव घ्यावी लागली.



काय आहे प्रकरण?

अंधेरीच्या मरोळ परिसरातील अग्निशमन दल केंद्राजवळील वस्तीत पीडित मुलाची आई तिच्या मुलासोबत राहते. नवऱ्याचा आजारपणात मृत्यू झाल्यामुळे घराची सर्व जबाबदारी तिच्यावर पडली आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य असल्यामुळे उच्चभ्रू वस्तीत कामं करून ती आपल्या मुलाला शिकवते. आपल्या मुलाने आपल्यासारखे वाईट दिवस पाहू नये, शिक्षण घेऊन मोठ्या हुद्यावर काम करावं, स्वतःचं नाव कमवावं, अशी तिचीही स्वाभाविक इच्छा.


संतापाने टोक गाठलं

मात्र तिच्या ८ वर्षांचा मुलाच्या कधी शाळेतून, तर कधी वस्तीतील मुलांच्या पालकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने ती त्रस्त झाली. शाळेच्या नावाखाली मुलगा फिरायला जात असल्याने ती कंटाळली. त्यातच त्याने पुन्हा एकदा शाळेला दांडी मारल्याची तक्रार शाळेतील शिक्षकांनी सोमवारी आईला केल्याने ती संतप्त झाली.


पोलिसांनी दिली समज

मुलाच्या प्रतापाने कंटाळलेल्या पीडितेने दुपारी १२ वाजता भर उन्हात अंगातील कपडे काढून मुलाला नग्न करत घराजवळच्या झाडाला बांधून ठेवलं. मुलाला दिलेली ही शिक्षा पाहून शेजारच्या इमारतीत राहणारेही घाबरून गेले. त्यातच पीडितेने दिलेल्या या शिक्षेचं चित्रिकरण मोबाइलमध्ये करून शेजारच्या एका व्यक्तीने ते थेट ट्विटरवर मुंबई पोलिसांना टॅग केलं. या घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, त्या मुलाची सुटका करत पीडितेला समज दिला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा