सोनं लुटणाऱ्या टोळीला अटक


सोनं लुटणाऱ्या टोळीला अटक
SHARES

बोरीवलीतील सोन्याच्या कारखान्यातून ४२ लाख रुपयांचं सोनं लुटणाऱ्या ९ जणांच्या टोळीला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. पंकज पांढरकामे (२५), समीर किसन राणा (२३), सफिक उल्ला इम्रान अमीर मंडळ (२४), संतोष हमराज राजभर (२४), तोयुद्दल सिद्धीक मंडल (१९), सचिन बाकेलाल गौड (२३), मोह. नाझीम निशाद अहमद अन्सारी (२०), शंकर सुलतान सिंग (२२), संतोष बबन तायडे (३६) अशी या आरोपींची नाव अाहेत.  हे सर्व आरोपी दहिसर ते गोरेगावदरम्यान राहणारे आहेत.


चोर बोलून मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार १८ जुलै रोजी रात्री ९.३० च्या सुमारास एक व्यक्ती बोरीवलीतील सोन्याच्या कारखान्यात ७० सोन्याच्या बांगड्या पॉलिश करण्यासाठी जात होता. त्यावेळी त्या कारखान्याबाहेर ४ जण उभे होते. त्यांनी त्याच्याकडं असलेलं सोनं पाहून त्याच्याशी वाद घातला. चोर चोर बोलून त्याला मारहाण करत सोन्याच्या सर्व बांगड्या घेऊन तेथून ते पळून गेले. ४८ तासांनंतर या आरोपींना पकडण्यात एमएचबी पोलिसांना यश आलं अाहे. या चोरांकडून ७० सोन्याच्या बांगड्यापैकी ६७ बांगड्या जप्त केल्या असून बाकीच्या बांगड्यांचा तपास पोलीस करत आहेत.



हेही वाचा -

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या गाडीला अपघात

डॅडीच्या हस्तकाला 23 वर्षांनी अटक



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा