अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या गाडीला अपघात


अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या गाडीला अपघात
SHARES

'बालिका वधू' आणि 'दिल ले दिल तक' या हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या गाडीचा शनिवारी दुपारी ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास ओशिवरा परिसरातील श्रीजी हॉटेलसमोर अपघात झाला. या अपघातात सिद्धार्थ गंभीर जखमी झाला असून त्याला जवळील सिद्दार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, हा अपघात कसा झाला याचं कारणं अद्याप समजलेलं नसून ओशिवरा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



कारवरील नियंत्रण सुटलं

श्रीजी हॉटेल समोरून जात असताना वेगात असलेल्या सिद्धार्थ शुक्लाचं कारवरील नियंत्रण सुटून समोरील कारला जोरदार धडक झाली. यामध्ये सिद्धार्थची कार डिव्हायडरवर धडकली. तर इतर तीन ते चार कारचंही यात नुकसानं झालं असून काही जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळं श्रीजी जंक्शन ते मेघा मॉल लिंक रोड हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.




हेही वाचा -

डॅडीच्या हस्तकाला 23 वर्षांनी अटक

फुकट रेल्वे प्रवासाच्या अामिषाने लुटणारे अटकेत



 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा