फुकट रेल्वे प्रवासाच्या अामिषाने लुटणारे अटकेत

प्रवाशांना फुकट प्रवासाचे आमीष दाखवून चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या टोऴीचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

SHARE

उत्तर प्रदेश अाणि बिहारसाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांना फुकट प्रवासाचे आमीष दाखवून चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या टोऴीचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मोहम्मद रफिक अल्लाउद्दीन राईंन (२८) , मोहम्मद दुल्हारे आलमगीर मन्सुरी (२१), मोहम्मद समशेर मोहम्मद आलिम मन्सुरी ( २८) अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व मूळचे बिहारमधील सीतामढी येथे राहणारे असून सध्या नवी मुंबईतील तुर्भेत राहतात.


रेल्वे पत्रावर प्रवास फुकट

 मुंबईत उत्तरप्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या गाड्यांना कायमच गर्दी असते.  या भागात जाणाऱ्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून मोठ्या प्रमाणात सुटतात. प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे प्रवाशांची ही गरज ओळखून त्यांना तिकीटाचे आमिष दाखवून चाकूच्या धाकावर हे आरोपी लुबाडायचे. 

मंगळवारी गोरखपूर एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी छायाराम रंगीलाल भारद्वाज तिकीट खिडकीच्या रांगेत उभे होते. यावेळी त्यांच्याजवळ आरोपी मोहम्मद अल्लाउद्दीन राईन, मोहम्मद दुलारे अल्लाउद्दीन मंसुरी हे दोघे आले.  त्यांना या दोघांनी कुठे जाणार म्हणून विचारपूस केली. तसेच आम्ही पण बस्तीला जात आहोत. आम्हाला तिकिटांची गरज नाही. आपल्या ओळखीचे सर्व अधिकारी आहेत.  ते रेल्वेत असून त्यांनी दिलेल्या रेल्वेच्या पत्रावर प्रवास फुकट असतो, असं सांगितलं.


मारहाण करून लुटले 

भरद्वाज यांनी विश्वास ठेवून होकार देताच आरोपी त्यांना रिक्षात बसवून काही अंतरावर घेऊन गेले. त्यांनी एका ठिकाणी रिक्षा थांबवली जिथे त्यांचा तिसरा साथीदार समशेर मोहम्मद आलिम अन्सारी हा होता. त्यांना अारोपींनी मारहाण करून बॅगमधून सामान तसंच मोबाईल हिसकावून  घेतला. तसेच एटीएम कार्ड घेतले. धमकी देऊन एटीएमचा पिन विचारून साडे अकरा हजार रुपये काढून घेतले.


सीसीटिव्हीची मदत

याबाबतची माहिती भारद्वाज यांनी कुर्ला लोहमार्ग पोलिस यांना दिली. पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीनं तिन्ही आरोपींची ओळख पटवून आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी भा. दं . वि. कलम ४२०, ४०६ अंतर्गत गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांनी दिली आहे.हेही वाचा -

नायझेरियन तस्करांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला, दगडानं ठेचून मारण्याचा प्रयत्न

रोड रोमियोला तरुणींनी दाखवला हिसका 

संबंधित विषय
ताज्या बातम्या