स्टंट करणाऱ्या विदयार्थ्याला पोलिसांनी पकडले

 Panvel
स्टंट करणाऱ्या विदयार्थ्याला पोलिसांनी पकडले

वडाळा - सीएसटी लोकलच्या छतावरून प्रवास करणाऱ्या फाझील शब्बीर कुरेशी या 16 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले. पण त्याला समज देऊन सोडण्यात आले. चेंबूरमधल्या म्युन्सिपल उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता 9वीत फाझील कुरेशी शिकतोय.

पनवेल ते सीएसटी दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या छतावर तो स्टंट करत होता. दरम्यान चेंबूर स्थानकावर त्याचा तोल जाऊन तो फलाटावर कोसळला. लोकलचा वेग कमी असल्याने तो किरकोळ जखमी झाला. मात्र चेंबूर स्टेशनवर पोलिसांनी फाझीलला ताब्यात घेऊन त्याचावर गुन्हा दाखल केला. पुन्हा अशी चूक करणार नसल्याचे कबूल केल्यामुळे त्याला न्यायालयात न पाठवता समज देऊन सोडण्यात आले, अशी माहिती वडाळा रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय.बी. सरोदे यांनी सांगितले.

Loading Comments