खिडकीचं शटर अंगावर पडून एकाचा मृत्यू

गोरेगाव इथं राहणारे सुनील गावकर गुरुवारी दुपारी इन्शूरन्सचे चेक गोळा करण्यासाठी आले होते. त्यावेळी बॅलार्ड इस्टेटच्या दिशेने जात असताना दरबार शॉ इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीचं शटर त्यांच्या अंगावर पडलं.

खिडकीचं शटर अंगावर पडून एकाचा मृत्यू
Darabshaw House in Ballard Estate (Hindustan Times)
SHARES

मुंबईतील बॅलार्ड इस्टेट भागात खिडकीचं शटर अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनील हरीशचंद्र गावकर (३२) असं या मृत व्यक्तीचं नाव असून तो इन्शूरन्स एजंट होता. गुरुवारी दुपारी सुनील दरबार शॉ इमारतीखालून जात असताना या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीचं शटर अचानक त्यांच्या अंगावर पडलं. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुनील यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

गोरेगाव इथं राहणारे सुनील गावकर गुरुवारी दुपारी इन्शूरन्सचे चेक गोळा करण्यासाठी आले होते. त्यावेळी बॅलार्ड इस्टेटच्या दिशेने जात असताना दरबार शॉ इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीचं शटर त्यांच्या अंगावर पडलं. गंभीर जखमी झालेल्या सुनिल यांना पाहून इमारतीच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली.

त्यानंतर, पोलिसांनी सुनील यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाची अधिक चौकशी करत पोलिसांनी दरबार शॉ इमारतीच्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा