बनावट व्हिजा बनवल्याने गुजरातच्या इंजिनिअरला अटक


बनावट व्हिजा बनवल्याने गुजरातच्या इंजिनिअरला अटक
SHARES

बनावट व्हिजाद्वारे परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या २३ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.  मलय दावरा असं या आरोपीचे नाव आहे.  त्याचा ताबा पुढील तपासासाठी गुन्हे शाखा ८ कडे दिला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. 


गुजरातचा रहिवाशी असलेल्या मलयने  सुरतमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र त्याचे कुटुंबिय पुढील शिक्षणासाठी त्याला परदेशात पाठवण्यासाठी आग्रही  होते. त्यासाठी घरातल्यांनी यूसएमधील एका नामांकीत काॅलेजमध्येही अर्ज केला होता.  काॅलेजकडून परीक्षेसाठी बोलवणेही आले होते. त्याला परदेशात शिक्षणासाठी जायचे नव्हते. मात्र घरातल्यांच्या दबावापुढे त्याचे काहीही चालत नव्हते.

अखेर घरातल्यांच्या दबावाला कंटाळून त्याने घरातल्यांची फसवणूक करण्यासाठी बनावट व्हिजा बनवला.  बनावट व्हिजा आणि पासपोर्टसह मलय विमानतळावर गेला असताना तपासणीदरम्यान त्याचा व्हिजा बनावट असल्याचं आढळलं. त्यामुळे सुरक्षा विभागाने त्याला अटक केली.



हेही वाचा  -

'मॉब लिचिंग'चे गुन्हे धार्मिक तेढ, राजकीय स्वार्थासाठीच

२० कोटींच्या कोकेनसह ब्राझिलियन नागरिकाला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा