"जय श्रीराम" बोलला नाही म्हणून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियांकडून मारहाण

याप्रकरणाची तक्रार वंचित बहुजन आघाडीने पोलिसात दाखल केली आहे.

"जय श्रीराम" बोलला नाही म्हणून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियांकडून मारहाण
SHARES

मुंबईत एका मराठी तरुणाला मारहाण करण्याता आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणाची तक्रार वंचित बहुजन आघाडीने पोलिसात दाखल केली आहे.

मुंबईत बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना मुंबईतल्या कांदिवली (Kandivali) इथं घडली. सिध्दार्थ अंगुरे नावाच्या एका मराठी तरुणाला परप्रांतिय टोळक्यांनी बळजबरीने 'जय श्रीराम' च्या (Jai Shri Ram) घोषणा द्यायला लावल्या.

सिद्धार्थने घोषणा द्यायला नकार दिल्याने तरुणाला या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. तसंच शिवीगाळ करत 'जय श्रीराम बोल नही तो मारुंगा' असं म्हणत परप्रांतीय टोळीने या तरुणाला जबर मारहाण केली. तरुणाचा भाऊ आणि नातेवाईकमध्ये आल्यामुळे कसाबसा हा तरुण थोडक्यात बचावला आहे. त्याच्यावर कांदिवलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय उपचार सुरू आहेत.

पीडित कुटुंबियांनी वंचित बहुजन आघाडीकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी सुरज तिवारी, अरुण पांडे, पंडित, राजेश रिक्षावाला यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम 341, 504, 323, 506, 34 अन्वये कांदीवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पोलिसांशी बोलून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं करणे, कट्टर धार्मिक बनवून तणाव निर्माण करणे अशा घटनांनी देश होरपळून निघत आहे. मुंबईसारख्या शहरात अशा घटना घडल्याने वंचित कडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलंय.हेही वाचा

"आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही", म्हणाऱ्याला मनसेची फटकार

पनवेल: 100 बेघर लोकांना लवकरच कायमस्वरूपी निवारा मिळणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा