मानखुर्दमध्ये तरुणाची आत्महत्या

 Maharashtra Nagar
मानखुर्दमध्ये तरुणाची आत्महत्या

मानखुर्द - येथील महाराष्ट्रनगर परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाने घरातील पोटमाळ्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे. सागर घाडी असे या तरुणाचे नाव असून तो आई-वडिलांसह येथील शांतीनगर परिसरात राहत होता.

कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ ट्रॉम्बे पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चौकशी करत मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवला. मृतदेहाशेजारी पोलिसांना एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे. यामध्ये आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये असा उल्लेख त्याने केला आहे.

Loading Comments