सचिन तेंडुलकरच्या मुलीला अश्लिल मेसेज पाठवणारा अटकेत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारासोबत एका इसमानं गैरवर्तन केल्याचा, तिला अश्लिल मेसेजेस पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. सारा तेंडुलकरने दिलेल्या तक्रारीवर तातडीने कारवाई करत मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने कोलकात्याहून या तरूणाला अटक केली आहे.

सचिन तेंडुलकरच्या मुलीला अश्लिल मेसेज पाठवणारा अटकेत
SHARES

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारासोबत एका इसमानं गैरवर्तन केल्याचा, तिला अश्लिल मेसेजेस पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा तेंडुलकर हिने या प्रकाराची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत साराने सांगितल्याप्रमाणे, हा इसम तिला वारंवार फोन करून त्रास देत होता.


कोलकात्याहून तरूणाला अटक

सारा तेंडुलकरने दिलेल्या तक्रारीवर तातडीने कारवाई करत मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने कोलकात्याहून या तरूणाला अटक केली आहे. यासंदर्भात तरूणाची चौकशी सुरु असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.


साराशी करायचं होतं लग्न!

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव देवकुमार मैती असं आहे. लवकरच देवकुमारला चौकशीसाठी मुबईत आणण्यात येणार असल्याचंही वृत्त आहे. देवकुमार मैती हा एक आर्टिस्ट असून आपलं सारा तेंडुलकरवर प्रेम असून तिच्याशी आपल्याला लग्न करायचं आहे असा त्याचा दावा आहे.

काही महिन्यांपूर्वी आरोपी देवकुमार मैती काही कामानिमित्ताने मुंबईत आला होता. त्यावेळी त्याला सारा तेंडुलकरचा मोबाईल क्रमांक मिळाला. तेव्हापासूनच तो साराला फोन करू लागला होता. सुरुवातीला साराने त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र नंतर जेव्हा देवकुमार साराला अश्लिल मेसेजेस पाठवू लागला, तेव्हा मात्र या त्रासाला कंटाळून तिने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा