अटकेनंतर समीर खानच्या वांद्रेच्या घरावर एनसीबीचा छापा, रामपूरमध्येही कारवाई


अटकेनंतर समीर खानच्या वांद्रेच्या घरावर एनसीबीचा छापा, रामपूरमध्येही कारवाई
SHARES

ड्रग्ज प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या समीर खान याच्या घरावर एनसीबी ने छापा टाकला आहे. समीर खान याच्या वांद्र्यातल्या घरी एनसीबीची टीम पोहोचली आहे, तिकडे सर्च ऑपरेशन सुरू आहे. करण सजनानी आणि समीर खान यांच्यात ड्रग्ज सप्लायबाबतचं चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे मिळाल्यानंतर एनसीबी ही छापेमारी करत आहे.

हेही वाचाः- मुंबईत सर्व बोर्डाच्या परीक्षा घेण्यास मंजुरी

दुसरीकडे एनसीबीची लखनऊची टीम रामपूरमध्येही गेली आहे. मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्यात रामपूर कनेक्शन समोर आल्यानंतर लखनऊ टीम धाडी टाकण्यासाठी रामपूरला गेली. एनसीबी लखनऊचे डीएसपी विशाल पवार आणि एनसीबीचे इन्सपेक्टर राजकुमार शाह, सब इन्सपेक्टर सुनील चौधरी यांच्या टीमने या धाडी टाकल्या. पीला तालाब चौकी जवळ सय्यद अन्वर याच्या घरावर ही धाड टाकण्यात आली. यानंतर एनसीबीला आपत्तीजनक वस्तू मिळाल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचाः- नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक

समीर खान हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री नवाब मलिक यांचा जावई आहे. समीर खान याला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. कोट्यधीश बिल्डर अशी ओळख असणाऱ्या करन सजनानी याला एनसीबीने बेड्या ठोकल्या. या करन सजनानी याच्या अटकेनंतरच विविध नावं समोर येऊ लागली. आधी मुच्छड पानवाला याचं नाव समोर आलं आणि आता समीर खान यालाही एनसीबीने अटक केली.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा