भांडुपमध्ये रिक्षा चोरणाऱ्या रॅकेटचा अखेर पर्दाफाश


भांडुपमध्ये रिक्षा चोरणाऱ्या रॅकेटचा अखेर पर्दाफाश
SHARES

आतापर्यंत बाईक चोरी होत असल्याचे आपण ऐकले असेल. पण आता रिक्षा देखील चोरी होऊ लागल्या आहेत! त्याचा प्रत्यय भांडूपमध्ये आला आहे. रिक्षा चोरून इतर जिल्ह्यांत नेऊन विकणाऱ्या एका भामट्याला अटक करत भांडुप पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.


अशी करायचा रिक्षाची चोरी...

आरोपी संतोष पाटील हा परिसरातील बंद असलेल्या रिक्षांवर पाळत ठेऊन असायचा आणि संधी मिळताच तिथून रिक्षा पळवून न्यायचा. नंतर त्या रिक्षाची नंबर प्लेट बदलून त्या रिक्षा इतर जिल्ह्यांत नेऊन विकायचा. भांडुप पोलिस ठाण्याच्या हद्दीत या ऑटो रिक्षा चोरीच्या घटना घडत होत्या. भांडुप पोलिस सातत्याने या आरोपीच्या शोधात होतेच. हा आरोपी भांडुप, कांजूरमार्ग आणि विक्रोळी परिसरात येत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना समजली होती. तेव्हा मोठ्या शिताफीने भांडुप पोलिसांनी आरोपी संतोष पाटील याला 18 जुलै रोजी भांडुपमधूनच अटक केली. 


त्याची पुढील चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून तब्बल 15 रिक्षा जप्त करण्यात आल्या. यात अजून काही आरोपीही सामील असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. इतर आरोपींविरोधात गुन्हे दाखल असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त परिमंडळ 7 चे सचिन पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.



हेही वाचा -

ट्रायलच्या नावावर कल्टी मारणारे बंटी-बबली!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा