ट्रायलच्या नावावर कल्टी मारणारे बंटी-बबली!

Vasai
ट्रायलच्या नावावर कल्टी मारणारे बंटी-बबली!
ट्रायलच्या नावावर कल्टी मारणारे बंटी-बबली!
ट्रायलच्या नावावर कल्टी मारणारे बंटी-बबली!
See all
मुंबई  -  

नवीन गाडी घेताना ग्राहकांना त्याची टेस्ट ड्राईव्ह द्यायची पद्धत बहुतेक सर्वच शोरुम्समध्ये असते. तशीच ती वसईच्या हॉट व्हीलरमध्येही आहे. पण हीच पद्धत त्यांना चांगलीच महागात पडली आहे. आणि त्याला कारण आहे एक बंटी आणि बबलीची जोडी! हा किस्सा आहे या बंटी-बबलीच्या चलाखीचा आणि एका हायफाय शोरुममध्ये झालेल्या बाईक चोरीचा!

वसईच्या हॉट व्हीलर शोरुममध्ये एक प्रेमी जोडपं बाईक खरेदी करण्यासाठी आलं. शोरुममधल्या कर्मचाऱ्याने सवयीप्रमाणे त्यांना बाईक दाखवली. बाईकची टेस्ट राईड हवी अशी इच्छा या जोडीनं बोलून दाखवली. कर्मचाऱ्यानं होकार देताच हे जोडपं 'टेस्ट राईड'साठी बाईक घेऊन निघालं. पण हे दोघे परत आलेच नाहीत!

सापळा रचून केली अटक

या प्रेमी युगुलाचे नाव दिपेश आणि पूजा असे आहे. जे या शोरूममध्ये बाईक खरेदी करण्याच्या बहाण्याने आले आणि ट्रायल बघायची आहे, असं सांगून बाईक घेऊन पसार झाले.

पण खूप वेळ वाट पाहूनही दोघे परतले नाहीत, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे शोरुम मालकाच्या लक्षात आलं. आणि त्याने यासंदर्भात माणिकपूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर या बंटी-बबलीचा शोध सुरू केला आणि सापळा रचून त्यांना अटक केली.

माणिकपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस या दोघांच्या शोधात होते. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी दोन हजार रुपये देऊन हिरो होंडाच्या शोरुममधून एक बाईक बुक केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. पुन्हा एकदा तशीच चोरी करण्याचा त्या दोघांचा प्रयत्न असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी शोरुममध्ये सापळा रचला. आणि हे दोघे शोरुममध्ये येताच पोलिसांनी त्यांना अटक केली.
हेही वाचा -

मौजमजेसाठी चोरी करणारे बंटी, बबली अटकेत

बाईकचोर सापडला सीसीटीव्हीच्या जाळ्यात!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.