वर्सोवा पोलिसांनी दिग्दर्शक अनुराग कश्यपला पाठवलं समन्स


वर्सोवा पोलिसांनी दिग्दर्शक अनुराग कश्यपला पाठवलं समन्स
SHARES

चित्रपट निर्माता (Director) अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. अनुराग विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात (versova police station) लैंगिक अत्याचार प्रकरणी (Sexual harassment) दाखल केलेल्या गुन्ह्यात त्याला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.  त्यानुसार अनुरागची वर्सोवा पोलिस ठाण्यात  उद्या चौकशीस पोलिस ठाण्यात हजर राहण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचाः- दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण

‘फ्रीडम’ या चित्रपटादरम्यान पीडित अभिनेत्रीची भेट कश्यपसोबत झाली होती. त्यावेळी तो ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्याच दरम्यान म्हणजे २०१४-१५ मध्ये कश्यपने परिस्थितीचा फायदा घेत लैगिक शोषण केल्याचे अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले आहे. तिने कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणीना घडलेला प्रकार सांगितल्यावर याबाबत वाच्यता करू नको असा सल्ला तिला त्यांच्याकडून देण्यात आला. तसेच ट्विटरवरील पोस्ट घरच्यांनी तिला डिलीट करायला लावली असे तिचे म्हणणे आहे. अनुराग कश्यपने २०१४ मध्ये माझ्यासोबत छेडछाड केली होती. ज्या मुली माझ्यासोबत काम करतात, त्यांच्यासोबत मी ‘गाला टाईम’ घालवतो, असे अनुरागने सांगितले असल्याचे ती म्हणाली. “त्यावेळी अनुरागच्या ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाचे काम सुरु होते. रणबीर कपूरसोबत एका चित्रपटात काम करण्यासाठी मुली त्याच्यासोबत शय्यासोबत करण्यास तयार होत्या, असेही त्याने म्हटले. यानंतर त्याने एक अडल्ट चित्रपट पाहण्यास सुरुवात केली. तो अचानक निर्वस्त्र झाला आणि मलाही कपडे काढण्यास सांगू लागला. त्यावेळी मी खूप घाबरले. मी आजारी असल्याचे कारण देऊन कसाबसा तिथून पळ काढला” असे अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले होते.

हेही वाचाः- मुंबईतील 'इतक्या' इमारती टाळेबंदीतून मुक्त

पीडितेने तिचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यासोबत वर्सोवा पोलीस ठाण्यात मंगळवारी जाऊन कश्यपविरोधात लेखी तक्रार दिली होती. तसेच त्याच्याविरोधात बलात्कार तसेच अन्य गंभीर कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार रात्री उशीरा कश्यपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी सांगितले. कश्यपवर कायदेशी कारवाई व्हावी, याकरता पीडित अभिनेत्रीने केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानुसार वर्सोवा पोलिसांनी अनुरागला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. अनुरागला पोलिसांनी गुरूवारी म्हणजेच उद्या चौकशीला बोलावले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा