झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू

कुर्ला - नारळाचं झाड कोसळल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना जागृतीनगरच्या बाबा टॉवरजवळ घडलीय. या मृत व्यक्तीचं नाव विनोद मोरे होतं. बुधवारी दुपारी 4 वाजताची ही घटना आहे. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय. "विनोद झाडाखाली उभे असताना अचानक झाड कोसळलं आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला," अशी माहिती प्रत्यक्षदर्शी ऐजाज खुरेशी यांनी दिली.

Loading Comments