तब्बल सहा महिन्यांनंतर सापडली अपह्रत मुलगी

  Malvani
  तब्बल सहा महिन्यांनंतर सापडली अपह्रत मुलगी
  मुंबई  -  

  मालवणी - मुंबईच्या मालवणी परिसरातून मागील 6 महिन्यांपूर्वी गायब झालेल्या एका अल्पवयीन मुलीला मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नायक पांडे यांनी उत्तर-प्रदेशमधून शोधून काढले.

  मिळालेल्या माहितीनुसार मालवणीमध्ये राहणाऱ्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला शेजारीच राहणाऱ्या 21 वर्षाच्या एका तरुणाने भुरळ घालून उत्तर प्रदेशमध्ये नेले होते. या घटनेनंतर मुलीच्या घरच्यांनी या संदर्भाची मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र पोलिसांचा शोध सुरू असतानाच आरोपी आणि त्याच्या कुटुंबिंयानी मुंबईतून पळ काढला.

  या घटनेच्या तब्बल सहा महिन्यांनंतर मालवणी पोलीस ठाण्याच्या झोन 11चे पोलीस उपायुक्त विक्रमसिंह देशमाने यांच्या आदेशानुसार मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नायक राजेश पांडे आणि मुंबई पोलीस पथकाने मुलीचा शोध सुरू केला. यादरम्यान, या पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरच्या डुमरिया पोलीस ठाण्यातल्या एसपी रामशंकर यांची मदत देखील घेतली. त्यानंतर आरोपी आणि त्याचे कुटुंबिय उत्तर प्रदेशच्या गौहनिया गावात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकून सर्वात आधी आरोपीच्या वडिलांना अटक केली. त्यानंतर घरात कैद करून ठेवलेल्या मुलीची सुटका करत अपहरणकर्त्या मुलाला अटक केली.

  पोलीस नायक राजेश पांडेंनी सांगितले की, भादंवि कलम 326, 323, 504, 506 पोस्कोअंतर्गत मोहम्मद इसराइल (21) आणि त्याचे वडील मोहम्मद इंसुल मो. सिद्दीकी याला अटक करत कारवाई केली. तर मुलीला डोंगरीतल्या बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.