अनोळखी रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करणे तरुणीला पडले महाग


अनोळखी रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करणे तरुणीला पडले महाग
SHARES

फेसबुकवर अनोळख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करणे एका 16 वर्षाच्या मुलीला चांगलेच महागात पडले आहे. त्या अनोळखी व्यक्तीने तिचेच फोटो घेऊन एडिट करत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराने घाबरलेल्या या मुलीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

16 वर्षाच्या बोरिवालीला राहणाऱ्या एका मुलीने काही दिवसांपूर्वी राज मल्होत्रा नावाच्या मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट त्याच्याशी कोणतीही ओळख नसताना अॅक्सेप्ट केली. राजने फेसबुक, इंस्टाग्रॅमवरून मुलीचे फोटो मिळवले आणि मग धमकीच सत्र सुरू झालं. हा इसम मुलीकडून तिचेच अश्लील फोटो मागू लागला, मुलीने मात्र त्याला भिक घातली नाही. त्यानंतर राजने कहरच केला. मुलीचे फोटो व्हिडियो घेऊन ते अश्लील प्रकारे एडिट करून त्याने ते थेट फेसबुकवर अपलोड केले.

या सगळ्या प्रकराने धास्तावलेल्या मुलीने सायबर पोलिसांकडून मदत मागितली असून "आपल्याला मदत करा अन्यथा आपलं करियर आणि भवितव्य नष्ट होईल" असं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

परिक्षेच्या काळात मुलगी तणावात होती, सुरुवातीला वाटलं परीक्षेचा ताण असेल पण नंतर आईने विचारल्यावर सगळा प्रकार समोर आला, विशेष म्हणजे तिच्या मित्र मैत्रीणीपैकी कोणीच या इसमाला ओळखत नाही. 

पीडित मुलीचे वडिल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा