कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू

कारवरील नियंञण सुटल्याने घडला अपघात

कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू
SHARES

वरळी येथे झालेल्या बीएमडब्ल्यू कारच्या अपघातात  सात महिन्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला.  या अपघातात एक महिलाही गंभीर जखमी झाला असून तिच्यावर जसलोक रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

 भावना भतीजा55, जुई गुरनानी 52 व सात महिन्यांची  निशिका यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तरी अपघातात नमिका भतीजा  38 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे.  सर्व कुटुंबीय अंधेरी येथील घरातून वरळी येथील एन एस सी आय येथे जेवणासाठी जात होती. गुरुनानी या कुटुंबाची जवळची नातेवाईक असल्यामुळे  ती वरळीला या गाडीत बसली.  मद्रास वाडी येथे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही कार दुभाजकाला धडकली. धडक एवढी गंभीर होती की गाडीत बसले का सर्वांनाच गंभीर दुखापत झाली स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून या  सर्वांना कोकणात दाखल केले तेथे नामिका आता मृत्यूशी झुंज देत आहे.

संबंधित विषय