बलात्काऱ्याला सात महिन्यांनंतर बेड्या

 Bandra west
 बलात्काऱ्याला सात महिन्यांनंतर बेड्या

चेंबूर - 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी सात महिन्यांनंतर बेड्या ठोकल्या. देविदास राठोड (23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो आणि त्याचा साथीदार पीडित तरुणीस अश्लिल फोटोंचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होते.

उस्मानाबाद येथे राहणारी पीडित तरुणी फेब्रुवारी महिन्यात मानखुर्द येथे राहणाऱ्या तिच्या मामाकडे आली होती. यावेळी ओळखीतल्या दोन तरुणांनी तिला फिरण्याच्या बहाण्याने चेंबूर परिसरात आणले. यादरम्यान आरोपींनी बलात्कार करून तिचे अश्लिल फोटो काढले. या फोटाेंचा धाक दाखवून आरोपींनी पीडितेवर सातत्याने बलात्कार केला. अखेर वैतागलेल्या या तरुणीने मंगळवारी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Loading Comments