कांदिवलीत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सराईत आरोपींना अटक


कांदिवलीत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सराईत आरोपींना अटक
SHARES

लाँकडाऊन दरम्यान मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त असल्याने मुंबईत गुन्हेगारीच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे पहायला मिळाले. मात्र कोरोनावर नियंत्रण मिळाल्यानंतर सरकारने सर्वत्र अनलाँकडाऊन करण्यास सुरूवात केल्यानंतर भूरट्या चोरांनी पून्हा माना वर काढण्यास सुरूवात केली आहे. अशातच कांदिवलीत एका मोबाइल शाँपीवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार सराईत आरोपींना समतानगर पोलिसांनी अटक केली आहे.

कांदिवलीच्या समतानगर परिसरात हा मोठ्या दाटीवाटीचा आहे. या परिसरातल्या पश्चिमद्रूतगती मार्गाला लागून असलेल्या बाणडोंगरी परिसरात आरोपी सागर चाळके, शरबहादूर सिंग, विकास जाधव, राकेश संकपाळ हे  लोखंडी सुरी,मिरचीची पूड, दोरी,  हातोडा आणि कटावणी घेऊन दुचाकीने संशयास्पद फिरत होते. त्यावेळी गस्तीवर असलेल्या समतानगर पोलिसांना या आरोपींवर संशय आल्याने त्यांनी चौघांची दुचाकी थांबवून त्यांची अंग झडती घेतली. त्यावेळी आरोपींजवळ ही घातक शस्त्र आढळून आली. पोलिसांनी या चौघांकडे चौकशी केली असता. ते सर्व समतानगरमधील ‘डिजीटल वर्ल्ड’ या मल्टी ब्रॅड मोबाइल शाँपीवर दरोडा टाकण्यासाठी निघाले असल्याची कबूली आरोपींनी दिली.

या प्रकरणी समतानगर पोलिसांनी चारही आरोपींवर ३९९,४०२, भा.द.वि कलमांसह ३७(१), १३५ मपोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस या  फरार आरोपीचा शोध घेत आहेत. यातील सागर, शरबहादूर, विकास आणि फरार आरोपीवर मुंबईत असंख्य गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा