अभिनेता अर्जुन रामपालला NCB ने पुन्हा बजावला समन्स


अभिनेता अर्जुन रामपालला NCB ने पुन्हा बजावला समन्स
SHARES

बॉलिवूड अंमली पदार्थ साखळीप्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपालला चौकशीसाठी पुन्हा समन्स पाठवला आहे. यापूर्वी रामपाल व त्याची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स यांची एनसीबीचे चौकशी केली होती. ड्रग्स वितरण साखळीप्रकरणी ही चौकशी करण्यात येणार आहे.

याप्रकरणी तपासात काही नवे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्याची पडताळणी करण्यासाठी रामपालची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. रामपाल चौकशीसाठी बुधवारी येण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः- कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस

रामपालने यापूर्वी झालेल्या चौकशीवेळी ड्रग्स प्रकरणी आपला काहीही संबध नसल्याचे त्याने सांगितले. आपल्याला या ड्रग्स बदद्ल काही माहिती नसल्याचे  सांगितले होते अर्जुन रामपाल याची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स  हिची एनसीबीने दोनवेळा चौकशी केली आहे. त्यापूर्वी अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. त्यात प्रतिबंधीत गोळ्या सापडल्या होत्या. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने व चिठ्ठीने आपण या गोळ्या घेत असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचाः- नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेपासून सर्वांसाठी लोकल ट्रेन?

अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिचा भाऊ अॅजिसिलाऊस डेमेट्रीअॅडेट्सला  एनसीबीने अटक केली होती. लोणावळा येथे डेमेट्रीअॅडेट्स राहत असलेल्या घरावर छापा टाकला. तेथे तो त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता. त्याच्याकडून ०.८ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर डेमेट्रीअॅडेट्सला खार येथील घराचीही झडती घेण्यात आली. तेथे अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली होती.याशिवाय अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला एनसीबीने अटक केली होती. पॉल हा ऑस्ट्रेलियन असून, तो एका मोठ्या बांधकाम कंपनीत काम करतो. तो वास्तू विशारद आहे

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा