Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस

केंद्र सरकारनं जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये कोरोना लसीकरण कसं केलं जाईल. तसंच याची संपूर्ण नियमावली राज्यांना पाठवली आहे.

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस
SHARES

मोदी सरकारनं कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.

तसे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत. पहिलं प्राधान्य हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ५० वर्षांवरील त्या व्यक्ती ज्यांना एखादा आजार आहे, अशांना देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारनं जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये कोरोना लसीकरण कसं केलं जाईल. तसंच याची संपूर्ण नियमावली राज्यांना पाठवली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं की, कोरोना लस आल्यानंतर ती लोकांपर्यंत कशी पोहोचवण्यात येईल, यासाठी चर्चा सुरू आहे.

  • लसीकरणासाठी प्रत्येकी पाच लोकांची टीम तयार करण्यात येणार आहे. यांना वॅक्सिनेटर ऑफिसर म्हटलं जाईल.
  • पहिला वॅक्सिनेटर ऑफिसर लसीकरणाच्या ठिकाणी असेल, जो सर्व आवश्यक कागदपत्र तपासल्यानंतरच कोरोना लस घेण्यासाठी सेंटरमध्ये येण्यास परवानगी देईल.
  • दुसरा ऑफिसर Co Win शी डेटा जोडून पाहिल.
  • तिसरा वॅक्सिनेटर ऑफिसर डॉक्टर असून व्यक्तीला लस देण्याचं काम करणार आहे.
  • उर्वरित दोन वॅक्सिनेटर ३० मिनिटांपर्यंत लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीचं निरिक्षण करतील आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचंही काम करतील.
  • लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.
  • एका दिवसात जवळपास एक सेशन होईल आणि यामध्ये जवळपास १०० ते २०० लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात येईल.
  • लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केवळ Co Win वरच करता येणार आहे. हे अॅप केंद्रीय मंत्रालय, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनद्वारा अपलोड करण्यात येणार आहे.
  • आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्थ इंशोरन्स स्मार्ट कार्ड, MNREGA जॉब कार्ड, पॅन कार्ड आदीपैकी एखादं डॉक्युमेंट देखील दाखवावं लागेल.

दरम्यान, कोणत्या कोरोना लसीचा पहिला डोस भारतात देण्यात येणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु, केंद्र सरकारनं कोरोनाच्या लसीकरण्याची संपूर्ण तयारी केली आहे.हेही वाचा

मुंबईतल्या 'या' भागातील गटारात आढळला कोरोना विषाणू

महापालिका मुंबईत उभारणार ४८ लसीकरण केंद्रे

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा