आऊच... कास्टिंग काउच

  मुंबई  -  

  ओशिवरा - कास्टिंग काउच. हा इंडस्ट्रीला लागलेला एक काळा डागच. अनेक कलाकारांनी याचा सामना केला असेल. कुणी हे स्वीकारलं, तर कुणी गप्प बसलं. पण अशी एक अभिनेत्री आहे जिनं कास्टिंग काउचला विरोध केला, न डगमगता या प्रकरणाचा सामना केला. अमन संधू असं या अभिनेत्रीचं नाव आहे. चित्रपटात काम देतो असं सांगून दिपक मिश्रानं तिला कॉम्प्रोमाइजची ऑफर दिली. चित्रपटातल्या रोलच्या बदल्यात दिग्दर्शक आणि निर्मात्यासोबत कॉम्प्रोमाइजची ही ऑफर अमन संधूनं सरळ धुडकावून न लावता दीपकला अद्दल घडवली. दिपक मिश्राचा खरा चेहरा आणि सत्य समोर आणण्यासाठी तिनं त्याला एका रेस्टोरेंटमध्ये बोलावलं. छुप्या कॅमेऱ्याद्वारे दीपकचं सत्य उघड केलं आणि एवढंच नाही, तर भररस्त्यात दीपक मिश्राला तिनं चांगलीच अद्दल घडवली, अगदी त्याच्या कानशिलातही लगावली.

  हे दोन्ही व्हिडिओ अमननं फेसबुकवर शेअर केलेत. दिपक मिश्राविरोधात अमन संधूनं ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल केलीय. अमन संधूनं क्राइम पेट्रोल, सब टीवी वरील मालिकांमध्ये आणि दोन चित्रपटांमध्येही काम केलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.