जामीन मिळूनही आर्यन खान आज तुरुंगात का? जाणून घ्या...

आर्यन खानला आजची रात्र पण का तुरुंगातच काढावी लागणार आहे.

जामीन मिळूनही आर्यन खान आज तुरुंगात का? जाणून घ्या...
SHARES

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. पण असं असलं तरी आर्यन खानला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे.

आरोपी आर्यन खान हा अमलीपदार्थांच्या व्यसनात नव्यानेच अडकला आहे, असं नाही. तो किमान दोन वर्षांपासून व्यसन करत आहे, असं सिंग यांनी नमूद केलं. व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर बोट ठेवत आर्यननं अमलीपदार्थांचा व्यापार करण्याचा प्रयत्न केल्याचं आणि तो या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं स्पष्ट होते, असा दावा अनिल सिंग यांनी केला.

आर्यन खानची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला होता की, अटक वॉरंटमध्ये वास्तविक आणि योग्य कारणांचा उल्लेख नसल्यामुळे अटक घटनात्मक तरतुदींचे थेट उल्लंघन आहे. मर्चंटची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मंगळवारी याच प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू या दोन आरोपींना विशेष एनडीपीएस कोर्टानं दिलेल्या जामीनकडे लक्ष वेधलं.

इतरही अनेक प्रकरणांचे आदेश लिहायचे असल्यानं त्वरित आदेशाची प्रत देणं शक्य होणार नाही. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत संपूर्ण आदेशाची प्रत उपलब्ध होऊ शकेल, असं न्या. सांब्रे यांनी रोहतगी यांना सांगितलं. जामीन आदेशाची प्रत शुक्रवारी उपलब्ध होणार असल्यानं आर्यन खानची गुरुवारची रात्रही आर्थर रोड तुरुंगातच जाईल.

बुधवारी न्यायालयानं म्हटलं होतं की, जर सरकारी वकिलांनी तासाभरात युक्तिवाद पूर्ण केल्यास गुरुवारीच या प्रकरणावर निर्णय देता येईल. गुरुवारी सुनावणीचा हा तिसरा दिवस होता. यापूर्वी दोन दिवस झालेल्या सुनावणीदरम्यान आर्यनसह जामीनासाठी त्याचा मित्र अरबाज मर्चंट यासह मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पुर्ण करण्यात आला.



हेही वाचा

क्रुझ ड्रग्ज प्रकरण : आर्यन खानचा जामीन मंजूर, शाहरुख खानला दिलासा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा