क्रुझ ड्रग्ज प्रकरण : आर्यन खानचा जामीन मंजूर, शाहरुख खानला दिलासा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे.

क्रुझ ड्रग्ज प्रकरण : आर्यन खानचा जामीन मंजूर, शाहरुख खानला दिलासा
SHARES

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah rukh khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अखेर जामीन (Bail) मंजूर झाला आहे. त्यामुळे शाहरुख खानला दिलासा मिळाला आहे. ३ ऑक्टोबरपासून तो ड्रग्ज केस प्रकरणात तुरुंगात होता. अखेर गुरुवारी त्याला जामीन मिळाला आहे. 

आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना देखील जामीन मिळाला आहे. जामीन आदेशाची प्रत शुक्रवारी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्यन खानची गुरुवारची रात्रही आर्थर रोड तुरुंगातच जाईल.     

मुंबई उच्च न्यायालयात २६ आणि २७ ऑक्टोबरला आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जांवर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये तिघांच्याही वकिलांनी जामीन देण्यासाठी युक्तीवाद केला. तर गुरुवारी एनसीबीच्या वतीनं वकीलांनी आपली बाजू मांडली.

अनिल सिंग म्हणाले, “आर्यन खान ड्रग्जचं नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसऱ्याला ड्रग्ज असल्याचं माहिती आहे. त्याने ड्रग्ज घेतले तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो. आर्यन आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रूममध्ये राहिले.”

“आरोपींचे वकील ड्रग्ज सेवन केलं होतं की नाही हे स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय चाचणी का केली नाही असा युक्तीवाद करत आहेत. मात्र, आमचा आरोप सेवनाचा नाही, तर ड्रग्ज बाळगल्याचा आहे. आर्यन खानने सेवनाच्या उद्देशाने ड्रग्ज बाळगले. हे प्रकरण सेवन करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगण्याचं आहे. आरोपींकडे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलीय. सर्व ८ आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सापडले. याची एकूण मात्रा पाहिली असता यात व्यापक विक्रीचा कट दिसतो,” असं अनिल सिंग म्हणाले.

“व्हॉट्सअॅपच्या चॅटवर आक्षेप घेता येणार नाही, कारण आमच्याकडे आरोपींचे ६५ ब प्रमाणे घेतलेले जबाब आहेत. त्या क्रुझ शिपवर पार्टीचं आयोजन केलं होतं आणि माझे अशील आरोपींना २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी अटक केल्याचं सांगत आहेत. तो ड्राय डे दिवस होता म्हणून आम्ही त्यांना जाऊ द्यायला हवं होतं का?” असं म्हणत अनिल सिंग यांनी आरोपींच्या वकिलांना टोला लगावला.

आर्यन खानची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला की, अटक वॉरंटमध्ये वास्तविक आणि योग्य कारणांचा उल्लेख नसल्यामुळे अटक घटनात्मक तरतुदींचं थेट उल्लंघन आहे.



हेही वाचा

क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र, बाळासाहेबांना हे...

समीर वानखेडे प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री, तपास करण्यासाठी...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा