चित्रिकरणाआधीच ‘पारूचा’ मृत्यू

 Goregaon
चित्रिकरणाआधीच ‘पारूचा’ मृत्यू

गोरेगाव - फिल्मसिटीमध्ये आणलेल्या पारू नावाच्या हत्तीणीचा शुक्रवारी मृत्यू झाला. एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी पारूला फिल्मसिटीमध्ये आणलं होतं. फिल्मसिटीच्या लेक साइड एरियात हे शूटिंग होणार होतं. त्यात पारूचा समावेश होता. 38 वर्षांच्या पारूचा शूटिंग सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला. जाहिरातीसाठी आणलेले हत्ती फॉरेस्ट विभागाच्या परवानगीनेच आणले होते, अशी माहिती चित्रनगरीचे असिस्टंट स्टुडिओ मॅनेजर शिवाजी भोसले यांनी दिली.

Loading Comments