परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, भ्रष्टाचार आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, भ्रष्टाचार आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
SHARES

मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Sing) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. परमबीर यांच्यासह ३२ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस (akola city kotwali police station) स्टेशनमध्ये बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे (Bhimraj Ghatge) यांनी केली.

त्यांनी या संदर्भातील तक्रार पोलीस महासंचालक तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. या सोबतच परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली.

यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांच्या डझनभर पोलीस अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचा हप्ता मागितल्याचा आरोप केला होता. आता परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.हेही वाचा

मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरण, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना समन्स

रुग्णालयातूनच रेमडेसिवीर इंजेक्शन चोरणाऱ्या नर्सचा पर्दाफाश, ५ साथीदारांसह अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा