COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

लॉकडाऊनमध्ये मद्यतस्करी प्रकरणी ’इतके’ गुन्हे दाखल

१ एप्रिल ते ९ जून या कालावदीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ लाख३१ हजार ३२० जणांनी परवान्यासाठी अर्ज केले असून त्यापैकी १ लाख २६ हजार १२१ जणांना आतापर्यंत परवाने देण्यात आलेले आहेत.

लॉकडाऊनमध्ये मद्यतस्करी प्रकरणी ’इतके’ गुन्हे दाखल
SHARES

राज्यात लाँकडाऊनचे चौथे चरण सुरू झाले असून सरकारने अनेक नियमात शितीलता आणली आहे. राज्याच्या मद्यविक्रीवरील ही निर्बंध सरकारने उठवल्याने ३२ जिल्ह्यात सध्या दारूची आँनलाईन विक्री केली जात आहे.१५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा दिल्याने राज्याच्या तिजोरीत कमालीची भर पडलेली आहे. गुरूवारी एका दिवसात  ६३ हजार ७३२ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली असून अवैध तस्करी करणाऱ्या ७७७२ जणांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे ही नोंदवलेले आहेत.

हेही वाचाः-  सध्या तर मुंबईत येण्याचं माझंही धाडस नाही, नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

राज्यात १५ मे २०२० रोजी पासून ते आतापर्यंत तब्बल ३ लाख ८३ हजार ३८३ ग्राहकांनी आँनलाईन मद्यखरेदी केली आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७,८८० अनुज्ञप्ती सुरू आहेत. माञ तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून अवैध मद्य तस्करी केली जात आहे. ही तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. १० जून, २०२० रोजी राज्यात ९६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.१६.८३ लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर २४ मार्च, २०२० पासून  १० जून, २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ७७७२ गुन्हे नोंदविण्यात आले असून ३६१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ६९५वाहने जप्त करण्यात आली असून रु.१९.५० /- कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचाः-कोरोनाच्या लढाईत पोलीसांना 'आपत्ती सेवा पदका'ने गौरवणार - गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने  Offline पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. १ एप्रिल ते ९ जून या कालावदीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ लाख३१ हजार ३२० जणांनी परवान्यासाठी अर्ज केले असून त्यापैकी १ लाख २६  हजार १२१ जणांना आतापर्यंत परवाने देण्यात आलेले आहेत.  सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता रु.१००/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.१,०००/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा