Advertisement

सध्या तर मुंबईत येण्याचं माझंही धाडस नाही, नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

सध्या तर मुंबईत येण्याचं माझंही धाडस नाही. पण मुंबईत जी काही परिस्थिती आहे, त्याकडे पाहता ही वेळ नक्कीच बदलेल, असं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

सध्या तर मुंबईत येण्याचं माझंही धाडस नाही, नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
SHARES

सध्या तर मुंबईत येण्याचं माझंही धाडस नाही. पण मुंबईत जी काही परिस्थिती आहे, त्याकडे पाहता ही वेळ नक्कीच बदलेल, असं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (coronavirus live updates I dont have any daring to come to mumbai right now says union minister nitin gadkari) यांनी केलं आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येकडे पाहता गडकरी यांनी केलेलं हे विधान सत्ताधारी महाविकास आघाडीच्या अपयशाकडे बोट दाखवणारं असल्याचं म्हटलं जात आहे. 

एका बाजूला महाराष्ट्रात खासकरून मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातून अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार कोरोनाचं संकट हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचं निदर्शनास आणून दिलं जात आहे. 

सोमवारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख १० हजार ७४४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात १७८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी ५८२२६ वर जाऊन पोहोचली आहे. मुंबईत ठिकठिकाणी फिल्ड हाॅस्पीटल, क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत असले, तरी सरकारी आणि खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांना खाटा मिळणं मुश्कील झालं आहे. खाट उपलब्ध झाल्यास रुग्णालयातील दुरावस्थेमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. वेगवेगळ्या रुग्णालयांत वाॅर्डमध्ये पडून असलेल्या मृतदेहांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर मोठी टीका विरोधकांकडून करण्यात आली होती.

हेही वाचा - गुजरातमध्ये जाऊन महाराष्ट्र पॅटर्न दाखवा, आव्हाडांचा विरोधकांवर पुन्हा निशाणा

मुंबईत दररोज १० हजार चाचण्या करण्याची क्षमता असताना मुंबई महापालिका प्रशासन चाचण्यांची संख्या कमी करत असल्याचा आरोप सातत्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढून मृतांचं प्रमाणही वाढत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.  

भाजपकडून होणाऱ्या आरोपांना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही तितक्याच जाेरदारपणे प्रतिउत्तर दिलं जात आहे. गुजरातचा कोविड-१९ मृत्यूदर हा ६.२५ टक्के असून महाराष्ट्रात ३.७३ टक्के इतका आहे. तेव्हा महाराष्ट्रात राहून गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना 'महाराष्ट्र पॅटर्न' काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा, असा खोचक सल्ला त्यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांना दिला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या संवादात ते कोरोनाबाबतची स्थिती जाणून घेणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा