रेल्वेपोलिसांनी घेतला हरवलेल्याचा शोध

  Pali Hill
  रेल्वेपोलिसांनी घेतला हरवलेल्याचा शोध
  रेल्वेपोलिसांनी घेतला हरवलेल्याचा शोध
  See all
  मुंबई  -  

  वडाळा - रेल्वेप्रवासादरम्यान हरवलेल्या एका व्यक्तीला शोधण्यात वडाळा पोलिसांना गुरुवारी यश आलं. कळव्याच्या खारेगाव येथील कुणाल अपार्टमेंटमध्ये राहणारे रविंद्र अडसुळे हे १४ ऑक्टोबरला कळवा ते शिवडी प्रवास करत असताना अचानक कुर्ला रेल्वे स्थानक फलाट क्र.८ वरील प्रवासी पूलावर उतरले. घरी आले नाही म्हणून त्यांच्या पत्नीनं दुसऱ्या दिवशी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गायब झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर चौकशीत रविंद्र मानसिक आजाराने त्रस्त असल्याचं समोर आलं. त्यानंतर वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय.बी.सरोदे यांच्या आदेशाने पोलीस हवालदार ए.बी.भिंगारदैवे यांनी तत्काळ वायरलेस मॅसेज, पोलीस गॅजेट, मनुष्य मिसिंग ब्युरो तसंच सीसीटीव्ही फुटेज मिळवून तपास सुरु केला. तपासात रविंद्र ठाणे रेल्वे स्थानकावरील बुकींग ऑफिस येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार 20 ऑक्टोबरला रेल्वे पोलिसांनी रविंद्र यांना शोधलं आणि कुटुंबियांच्या स्वाधीन केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.