डहाणूत अंमलीपदार्थाच्या कारखान्यावर धाड, १८ लाखांचं 'एमडी' जप्त


डहाणूत अंमलीपदार्थाच्या कारखान्यावर धाड, १८ लाखांचं 'एमडी' जप्त
SHARES

आंबोली पोलिसांनी डहाणूतील एका कारखान्यावर धाड टाकून १८ लाख रुपयांच्या 'मेफेड्रॉन' (एमडी)सह हे अंमलीपदार्थ बनविण्यासाठी लागणारे रसायन आणि साहित्य असा एकूण ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारखान्यात काम करणाऱ्या चार आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आंबोली पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. दया नायक यांनी सोमवारी रात्री अंधेरी पश्चिमेकडील न्यू लिंक रोड, सिटी मॉल समोरील बस स्टॉपजवळ नदीम नासीर शेख (२७) या आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्याच्याकडे २० लाख रुपये किमतीचे १ किलो वजनाचे मेफेड्रॉन (एमडी) सापडले होते.



शेख याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थ आले कोठून? याची चौकशी करत असताना शेख याने आपण काही साथीदारांसोबत डहाणूतील कारखान्यात अंमलीपदार्थ बनवून ते मुंबई शहर आणि राज्याबाहेर पाठवत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली होती.

त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पो.नि. साळुंखे, केदारी पवार, पो.उ.नि. दया नायक आदींनी शेख याच्यासह पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील कारखान्यावर छापा टाकला. तेव्हा तेथे ३० ते ४० वयोगटातील काही इसम अंमलीपदार्थ बनवताना आढळून आले. पोलिसांनी या कारखान्यातून ६५ हजार रुपये रोख, १८ लाख रुपये किमतीचे ९०० ग्रॅम एमडी, एमडी हे अंमलीपदार्थ बनवण्यासाठी लागणारे ४१ लाख २५०० रुपये किमतीचे रसायन जप्त केले.

 


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा