अमेरिकन चोराला अटक


अमेरिकन चोराला अटक
SHARES

मुंबई - एयर इंटेलिजन्स युनिटने गेल्या दोन दिवसांत तब्बल ७४ लाखांचं सोन जप्त केलं असून १७६ आयफोन्स देखील जप्त केले आहेत. वेगवेगळ्या कारवाईत एआययूने एका अमेरिकन नागरिकासह एकूण सहा जणांना अटक केली आहे.

सोमवारी रात्री दुबई वरून येणाऱ्या दृष्टमत वर्दनयांन (Drastamat Vardanyan) नावाच्या अमेरिकन नागरिकाला ताब्यात घेतले, त्याच्या तपासणीत एआययूला तब्बल सव्वा किलो वजनाच्या सोन्याच्या चेन मिळाल्या. भारतीय बाजारात या सोन्याची किंमत ३४ लाखांच्या घरात आहे. याचबरोबर परदेशातून येणाऱ्या साजिद याकूब नावाच्या प्रवाश्याकडून एआययूने तब्बल १७६ आयफोन्स जप्त केले आहेत. हे सगळे आयफोन्स वापरले असले तरीही यांची किंमत हि १७ लाखांच्या घरात असल्याचं एआययूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या व्यतिरिक्त एआययूनं गेल्या दोन दिवसात तब्बल ४१ लाखांच्या सोन्यासह चौघांना अटक केली आहे. एवढेच नव्हे तर रिमोट बे मध्ये असलेल्या इंडिगो एअरलाईनच्या फ्लाईट नंबर 6E- 062 मधून प्रवाशी सीटच्या खाली केव्हीटी करून अतिशय पद्धतशीररित्या लपवण्यात आलेले २० लाखांच्या सहा सोन्याच्या विटा देखील जप्त केल्या आहेत.

संबंधित विषय