Exclusive कार डिझायनर दिलीप छाबरियाच्या अडचणीत वाढ, २२ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल


Exclusive कार डिझायनर दिलीप छाबरियाच्या अडचणीत वाढ, २२ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल
SHARES

डीसी डिझाइनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रीया याच्याविरोधात २२ कोटी रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला आहे. कार नोंदणी फसवणूक प्रकरणी यापूर्वीच  गुप्तवार्ता (सीआययू) पथकाने अटक केली होती. तसेच आणखी एका अभिनेत्रीची दिलीप छाबरिया यांनी फसवणूक केली असल्याने छाबरिया विरोधात तक्रार देण्यासाठी ती पुढे आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


दिलीप छाबरिया हे देशातील एक सुप्रसिद्ध कार डिझायनर आहेत. सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोकांच्या कार डिझाईन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅनही दिलीप यांनी डिझाइन केली होती. क्रिकेटर दिनेश कार्तिकनेही दिलीपविरोधात २०१५ मध्ये गुन्हा दाखल केला होता. दिनेश कार्तिकचे म्हणणे होते की, दिलीप छाबरिया यांना पाच लाख रुपये देऊनही त्याने काम योग्य केले नसल्याचा आरोप होता.एकाच चेसिस आणि इंजिन नंबरची वेगवेगळ्या राज्यात अनेकदा नोंदणी, स्वतःच तयार केलेल्या कार कर्ज घेऊन स्वतः खरेदी करणे, तसेच एका वाहनावर अनेकदा कर्ज घेणे अशाप्रकारचा डीसी डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा घोटाळा पोलिसांनी डिसेंबरच्या अखेरीस उघडकीस आणला. कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करीत संस्थापक संचालक दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली. दोन वेळा पोलिस कोठडी मिळाल्यानंतर छाब्रिया यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

२०१६ ते २०१८ च्या दरम्यान छाबरियाने एका ऑटोपार्ट विक्रेत्याकडून कारचे सुटे भाग खरेदी केली व त्याची रक्कम दिली नाही, असा छाबरियाविरोधात आरोपी आहे. या व्यावसायिक चेन्नई येथील रहिवासी आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे १८ कोटी रुपये येणे बाकी आहे, पण व्याज पकडून ही रक्कम २२ कोटींपर्यंत पोहोचते. नरीमन पॉईंट परिसरात एक बनावट नंबर प्लेट असलेली स्पोर्टस कार येणार आहे. त्यानुसार, सचिन वझे यांनी सापळा लावला होता. या कारच्या झडती घेतली असता, या कारवर बनावट नंबर प्लेट असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याचा चेसी नंबर देखील बदलल्याचे पोलिसांना आढळले. तसेच छाब्रीया याने त्याच्या कंपनीच्या माध्यमातुन १२० स्पोर्टस कार देश परदेशात विकल्या असुन, यातील सरासरी एका कारवर ४२ लाख एवढे कर्ज असल्याचे समोर आले आहे. तर यातील ९० कारमध्ये आर्थीक घोटाळा असुन, याचा अधिक तपास सुरु आहे.

त्यानुसार, पोलिसांनी ही कार ताब्यात घेत, ती बनविणा-या दिलीप छाब्रीयाला अटक केली होती. ही कार चेन्नई येथे रजिस्टर असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांचा मुलगा बोनिटो छाब्रिया यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  क्रिकेटर दिनेश कार्तीक याने या कंपनीचा मालक छाब्रीया विरोधात न्यायालयात तक्रार केली होती. त्याने दिनेश कार्तीकला कार देतो असे सांगत ५ लाख रुपये अॅडव्हान्स घेतल्याचे देखील समोर आले होते. प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया याने कॉमेडियन कपील शर्मालाचीही साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कपील शर्माचा याचा जबाब नोंदवण्यात आला.


कपील शर्माने छाबरियारियाला महागडी व्हनिटी व्हॅन बनवण्यास सांगितले होते. त्याचे सर्व पैसे शर्माने दिले होते. पण त्याबदल्यात त्याला व्हॅन मिळालीच नाही. याप्रकरणी गेल्यावर्षी कपील शर्माने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. नुकतीच कार नोंदणीप्रकरणी दिलीप छाबरियाला अटक झाल्यानंतर त्याबाबतच्या बातम्या पाहून कपील शर्मा यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांना संपर्क साधला. त्याप्रकरणीही त्याला अटक झाली आहे. आता या नवीन प्रकरणामुळे छाबरियाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा