‘त्या’ विकासकाविरोधात आणखी एक गुन्हा

ऑगस्ट महिन्यात जुहू येथे पहाटे व्यावसायिक अब्दुल शेख(५५) याची हत्या करण्यता आली होती.

‘त्या’ विकासकाविरोधात आणखी एक गुन्हा
SHARES

जुहू येथील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाविरोधात डी.एन. नगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सामाजिक कार्यकर्त्याला मारण्याचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

हेही वाचाः- विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त

ऑगस्ट महिन्यात जुहू येथे पहाटे व्यावसायिक अब्दुल शेख(५५) याची हत्या करण्यता आली होती. नमाज अदा करून आल्यानंतर अंधेरी पश्चिम येथील सोफी हाऊस येथे हल्लेखोरांनी त्यांच्या धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. याप्रकरणी अशोक छाजड, अब्दुल लतीफ ऊर्फ सोनू व नदीम यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी वासिम खानला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्याचे वडील खालिद फेशकार, त्याचा भाऊ नसीम खान यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. दोघेही पोलिसांच्या हाती लागले नसल्यामुळे डी.एन. नगर येथील तक्रारदार अद्याप पुढे आले नव्हते.

हेही वाचाः- येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास करता येणार- उद्धव ठाकरे

पण नोव्हेंबरमध्ये ते दोघेही पोलिसांना शरण आल्यानंतर तक्रारदार मोहम्मद अन्वर निजाम खान यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. झोपडपट्टी पुनर्वसन वादातून आरोपींनी त्यांच्याही हत्येचा कट रचला होता. तसेच २०१८ मध्ये आपल्याला हत्येची धमकीही दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार याप्रकरणी कट रचणे, धमकावणे आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तिनही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून त्यांचा लवकरच लाबा घेण्यात येणार आहे. दरम्यान शेख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी याप्रकरणी मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा