Advertisement

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास करता येणार- उद्धव ठाकरे

येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून करू शकू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास करता येणार- उद्धव ठाकरे
SHARES

येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून करू शकू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी शनिवार ५ डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील शिवणी (रसुलपूर) इथं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

महामार्गाची पाहणी केल्यावर समाधान व्यक्त करताना उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले, आज पहिल्यांदाच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाचं काम अप्रतिम चालू आहे. प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असं आपण काम केलेलं असेल.

आपण हे काम गतीने करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडंसं हळुवारपणे होईल. पण त्या काळातसुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही. मला खात्री आहे, येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकू. या मार्गाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे, सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत आहोत. येत्या १ मे पर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मे पर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू, असा विश्वास देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- मराठा आरक्षणारील सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झालं. नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे याचं स्वागत केलं. यावेळी खासदार कृपाल तुमाने, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अप्पर पोलीस आयुक्त दिलीप झळके, सुनील फुलारी, उपायुक्त नरुल हसन, बसवराज तेली, जिल्हा पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) राकेश ओला, वरिष्ठ विमानतळ अधिकारी आबीद रूही, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर उपस्थित होते.

त्यानंतर ते अमरावतीकडे हेलिकॉप्टरने रवाना झालेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील शिवणी रसुलापूर हेलिपॅडवरून मौजे देऊळगव्हाण इथं पोहोचून मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली.

त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवाडीकडे मुख्यमंत्र्यांनी प्रयाण केलं. त्यानंतर गोळवाडी हेलिपॅड इथं जाऊन मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. 

(maharashtra cm uddhav thackeray visited hinduhridaysamrat balasaheb thackeray maharashtra samruddhi highway)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा