'डी गँग'ला आणखी एक धक्का, ड्रग्ज माफिया आरिफ भुजवालाला रायगड मधून अटक


'डी गँग'ला आणखी एक धक्का, ड्रग्ज माफिया आरिफ भुजवालाला रायगड मधून अटक
SHARES
अंडरवल्ड ड्रग्ज माफिया आरिफ भुजवालाला  रायगड परिसरातून अटक करण्यात NCB  च्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. NCB ने आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कामगिरी आहे. काही दिवसांपूर्वीच आरिफच्या घरावर NCB ने कारवाई करत, कोट्यावधी रुपयांची रोकड आणि काही किलो ड्रग्ज जप्त केले होते.

NCB च्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात सुरू असलेल्या ड्रग्ज फँक्ट्रीवर कारवाई करत, डी गँगचे कंबरड मोडलं होते. मात्र या कारवाई दरम्यान मुख्य आरोपी आरिफ भुजवाला NCB  च्या हाताला लागला नव्हता. चौकशीत आरिफ आणि त्याच्या साथीदारांनी  मागील ५ वर्षात तब्बल १५०० कोटींचे ड्रग्ज विकून काही हजार कोटी रुपये कमवल्याचे समोर आल्यानंतर या गुन्ह्यांची व्यापक्त किती आहे हे लक्षात येते.

NCB चे अधिकारी समीर वानखडे हे सध्या डी गँगसाठी कर्दनकाळ ठरत आहे.कारवाई दरम्यान NCB ने २ कोटी १८ लाखांची रोकड आणि १२ किलो ड्रग्जसह शस्त्रही हस्तगत केले होते. या प्रकरणी पोलिसांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणसह तिघांना अटक केली होती. आरोपींच्या चौकशीत आणि त्यांच्याजवळ मिळालेल्या डायरीतून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईत ड्रग्स विकून दहशतवादाला आर्थिक पुरवठा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्याच बरोबर चिंकू पठान यांच्याजवळ आढळलेल्या डायरीत पोलिसांना दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम आणि फहिम मचमच यांच्याही नावाचा उल्लेख आढळून आला आहे.

डी गँगला या कारवाईमुळे मोठा हादरा बसला असताना. फरार आरोपी आरिफला NCB  ने रायगड परिसरातून अटक केली. आरिफच्या अटकेमुळे डी गँगचे अनेक आरोपी आता NCB च्या रडारवर आले आहेत. आरिफच्या घरात मिळालेल्या डायरीतून अनेक बडी नावही समोर आली आहेत. ड्रग्स तस्करीतून दाऊद आणि त्याच्या हस्तकांनी कमावलेली संपत्तीची ही जप्त केली जाणार आहे. त्याच बरोबर या सर्व गुन्ह्यांसंदर्भाची माहिती ईडी आणि एनआयएला देखील देणार आहे. काही दिवसात मुंबईतून दाऊदची दहशत संपवणार आणि ड्रग्ज तस्करीला कायमचा ब्रेक लावण्याचा दावा NCB चे अधिकारी समीर वानखडे यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमिवर समीर वानखडे यांच्या सुरक्षाही वाढवली आहे.

आरिफ हा मागील ५ ते ६ वर्षापासून डोंगरी परिसरात ड्रग्जची फँक्ट्री चालवत होता. विविध खाद्यपदार्थातील तो हे ड्रग्ज देशातील ७ देशात पाठवत असल्याचे तपासा दरम्यान समोर आले आहे. मुंबई महाराष्ट्रात आरिफ हा सर्वात मोठा ड्रग्ज डिलर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा