हसिना पारकरचा मुलगा पोलिसांच्या रडारवर

या प्रकरणात हसीना पारकरच्या मुलाचे नाव पुढे आले आणि पोलिसांच्या भूवया उंचावल्या, पोलिसांना हसिनाच्या मुलासह 11 जणांना चौकशीसाठी बोलवले.

हसिना पारकरचा मुलगा  पोलिसांच्या रडारवर
SHARES
पैशाच्या वादातून आग्रीपाड्यातील व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची बहिण हसिना पारकरचा मुलगा पोलिसांच्या रडारवर आला आहे. शुक्रवारी पोलिसांनी त्याच्यासह 11 जणांची पाच तास चौकशी केली. या प्रकरणात सहभाग असल्यास त्याला ही अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

  मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केलेला आरोपी अश्पाक  रफिक टोपीवाला (34) याने एका व्यावसायिकासोबत तीन वर्षापूर्वी चीनमधून इलेक्ट्राँनिक वस्तू खरेदी करून त्या दुबई आणि भारतात विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. व्यावसायिक पैसे पुरवायचा त्यानुसार अश्पाक चीनमधून वस्तू खरेदी करून भारत सरकारचा कर बुडवाचा. सर्व काही सुरळीत सुरू असताना. नोटबंदीची घोषणा झाली. त्यात अश्पाक कर्जबाजारी झाला. माञ विकलेल्या मालाचे 15 लाख 50 हजार तो व्यावसायिकाला देणे बाकी होता. मागील काही महिन्यांपासून व्यावसायिकाने अश्पाककडे पैशांसाठी तगादा लावला होता. या व्यवहारात  आरोपी अहमद राजा अफ्रोज वधारिया (24) याचा ही सहभाग होता. तो गुजरात सूरत येथून कारभार संभाळायचा. व्यावसायिकापासून पिच्छा सोडवण्यासाठी त्याने रिजवान याच्याकडे मदत मागितली. 2016 मध्ये रिजवाननेच दुबईत फईम आणि छोटा शकिलची अहमद याच्याशी ओळख करून दिली होती. त्यानुसार रिजवानने काही पैशांसाठी या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा शकिल आणि त्याचा हस्तक फईम चमचम याला खेचले.

हसिनाच्या मुलाची 5 तास चौकशी


या प्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाने 22 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात हसीना पारकरच्या मुलाचे नाव पुढे आले आणि पोलिसांच्या भूवया उंचावल्या, पोलिसांना हसिनाच्या मुलासह 11 जणांना चौकशीसाठी बोलवले. तब्बल पाच तास  त्याची चौकशीकरून पोलिसांनी त्याला घरी सोडल्याचे कळते. तसेच त्याला मुंबई बाहेर जाण्यास ही मज्जाव करण्यात आला आहे. दिवसेंदिवसे या प्रकरणात नवनवे खुल्लासे समोर येत आहे. या प्रकरणात हसिनाच्या मुलाचा सहभाग आढळल्यास त्याच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात येईल. या टोळीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा

अंडरवर्ल्डमध्ये व्हाॅट्स अॅप रेकाॅर्डिंगचा ट्रेंड


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा