अंडरवर्ल्डमध्ये व्हाॅट्स अॅप रेकाॅर्डिंगचा ट्रेंड

व्हाॅट्स अॅपवरील व्हाईस रेकाॅर्डिंग या फिचरचा अंडरवर्ल्डमध्ये बोलबाला आहे. रेकाॅर्डिंग केलेली क्लिप समोरच्याला पाठवली, त्याने ती ऐकून डिलिट केली की कोणताही पुरावा रहात नाही. त्यामुळे सध्या व्हाॅट्स अॅपचं हे फिचर पोलिसांसाठी चांगलंच डोकेदुखीच ठरत आहे.

अंडरवर्ल्डमध्ये व्हाॅट्स अॅप रेकाॅर्डिंगचा ट्रेंड
SHARES
व्हाॅट्स अॅपवरील व्हाईस रेकाॅर्डिंग या फिचरचा अंडरवर्ल्डमध्ये बोलबाला आहे. रेकाॅर्डिंग केलेली क्लिप समोरच्याला पाठवली, त्याने ती ऐकून डिलिट केली की कोणताही पुरावा रहात नाही. त्यामुळे सध्या व्हाॅट्स अॅपचं हे फिचर पोलिसांसाठी चांगलंच डोकेदुखीच ठरत आहे. याच फिचरमुळे पैशांच्या वादातून व्यावसायिकाला धमकावणारा गुंड आणि अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान इक्बाल इब्राहिम (कासकर) (३०)आणि २ हस्तकांचा पर्दाफाश पोलिसांना करता आला आहे.

सूत्र रिझवानच्या हाथी

रिझवान हा दाऊदचा छोटा भाऊ इक्‍बाल कासकरचा मुलगा आहे. इक्बालला ठाणे गुन्हे शाखेने खंडणीप्रकरणी अटक केल्यापासून  तो डी कंपनीत सक्रिय झाला होता. गेल्या वर्षी इक्‍बालपर्यंत गुप्त संदेश देऊन कारागृहात गेल्यापासून तो सर्वात पहिल्यांदा पोलिसांच्या रडारवर आला होता. त्यानंतर इब्राहिम या आडनावाखाली रिझवान मुंबई आणि आसपासच्या शहरातील विकासकांवर नजर ठेवू लागला. थोडक्यात म्हणायचं झालं, तर तो डी कंपनीचा मुंबईतला सूत्रधार झाला.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केलेला आरोपी अश्पाक रफिक टोपीवाला (३४) याने एका व्यावसायिकासोबत ३ वर्षांपूर्वी चीनमधून इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदी करून त्या दुबई आणि भारतात विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. व्यावसायिक पैसे पुरवायचा तर अश्पाक चीनमधून वस्तू खरेदी करायचा. सर्व काही सुरळीत सुरू असताना नोटबंदीची घोषणा झाली. त्यात अश्पाक कर्जबाजारी झाला. मात्र विकलेल्या मालाचे १५ लाख ५० हजार तो व्यावसायिकाला देणं बाकी होता.

व्यावसायिकाने अश्पाककडे या पैशांसाठी तगादा लावला होता. या व्यवहारात आरोपी अहमद राजा अफ्रोज वधारिया (२४) याचाही सहभाग होता. तो गुजरातच्या सूरत इथून कारभार संभाळायचा. व्यावसायिकापासून पिच्छा सोडवण्यासाठी त्याने रिझवानकडे  मदत मागितली. २०१६ मध्ये रिझवाननेच दुबईत फईम आणि छोटा शकिलची अहमद याच्याशी ओळख करून दिली होती. त्यानुसार रिझवानने काही पैशांसाठी या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा शकिल आणि त्याचा हस्तक फईम मचमच याला खेचलं.

'अशी' झाली अटक

या प्रकरणात गुंड फईम मचमचच्या नावाने पैसे न मागण्यासाठी तक्रारदाराला धमकवल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली. चौकशीत हा फोन फईमने नसून अहमदने केल्याचं निदर्शनास आले. मात्र अहमद सध्या दुबईत असून तो २ दिवसांपूर्वी मुंबईत येणार असल्याचं कळालं.

त्यानुसार पोलिसांनी विमानतळ पोलिसांना सतर्क केल्यानं २ दिवसांपूर्वी अहमद मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्याला पकडलं. अहमद पकडला गेल्याची बातमी सर्व वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्यानंतर पोलिस कधीही आपल्याला अटक करु शकतात. या भीतीने रिझवान सपत्नीक बुधवारी रात्री दुबईला पळण्याच्या तयारीत होता. मात्र वेळीच ही माहिती पोलिसांना मिळ्ल्यानंतर पोलिसांनी रिझवानला बेड्या ठोकल्या. तर यातील तिसरा आरोपी अश्पाक याला पोलिसांनी डोंगरी खडक परिसरातून अटक केली.


पोलिसांसमोरच  दिली धमकी

पैशांच्या व्यवहारातून धमकावण्यात आल्यावर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर १६ जुलैला पोलिसांनी विमानतळाहून अहमदलला अटक केली. या अटकेनंतर पोलिसांनी चौकशीसाठी व्यावसायिकाला खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बोलवलं होते. नेमकं त्याच वेळी एका अनोळखी नंबरहून व्यावसायिकाला फोन आला. फोन उचलताच समोरून ' तूने अहमद राजाको पकडवाके दिया, इसका अंजाम बुरा होगा ' असं धमकावून फोन कट करण्यात आला. या अनोळखी नंबरचा सध्या पोलिस माग काढत आहेत. हे पहिलंच प्रकरण असून या तिघांनी अशा प्रकारे अनेक व्यावसायिकांची फसवणूक केल्याचं पोलिस तपासात  निदर्शनास आले आहे. या तिघांनाही न्यायालयाने २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

'अशी' देत होते धमकी

फोन किंवा व्हाॅट्स अॅप चॅटचा डेटा पुन्हा मिळवता येत असल्यामुळे डी कंपनीने व्हाॅट्स अॅप रेकाॅर्डिंगद्वारे संपर्क सुरू केला होता. १३ जून रोजी व्यावसायिकाला पहिल्यांदा व्हाॅट्स अॅप रेकाॅर्डिंगद्वारे अहमदने संदेश पाठवला होता. त्यात त्याने 'फईम भाईचा फोन येईल, ऐकलं नाही तर जीव गमवावा लागेल' असं म्हटलं होतं. त्यानंतर असे अनेक रेकाॅर्डिंग व्यावसायिकाला पाठवण्यात आले. त्यात फईम मचमच, अश्पाक आणि अहमदच्या रेकाॅर्डिंगचा समावेश आहे. 

रिझवाननं नाव बदललं 

रिझवानच्या आडनावामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा त्याच्यावर लक्ष ठेवून असायच्या. सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत न येण्यासाठी रिझवानने त्याचं नाव बदलून मोहम्मद रिजवान इक्बाल हसन शेख  इब्राहिम (कासकर) असं ठेवले होतं. बहुदा हे त्याचं बनावट पासपोर्टवरील नाव असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रिझवानवरील हा पहिलाच गुन्हा आहे. तर अहमदवर या पूर्वीही गुजरातमध्ये गुन्हा नोंदवल्यात आला आहे. तो बनावट पासपोर्टवर मुंबईत दाखल झाला होता. त्याने त्याचा पहिला पासपोर्ट एका व्यावसायिकाकडे ५० लाखांसाठी गहाण ठेवला होता. त्यानंतर परदेशात जाण्यासाठी अहमदने कोलकताहून बनावट पासपोर्ट बनवल्याचं चौकशीत पुढे आलं आहे.



हेही वाचा-

 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा