अभिनेता एजाज खानला सायबर पोलिसांनी केली अटक

आरोपींच्या मदतीने एजाजने पून्हा एकदा टिकटाँक करत मुंबई पोलिसांना उद्देशून दुसरा व्हिडिओ बनवाला. त्यात एजाजने टिकटाँक करणार्या मुलांचे समर्थन करत मुंबई पोलिसांना टोकून बोलले होते.

अभिनेता एजाज खानला सायबर पोलिसांनी केली अटक
SHARES
आरोपीसोबत वादग्रस्त व्हिडिओ बनवल्याप्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांनी अभिनेता बिग बाॅस फेम एजाज खानला बुधवारी सकाळी अटक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहे.


पोलिसांवर टीका

 टिकटाॅक ०७ ग्रुपच्या तबरेज अंसारीने मोब्लिंचिंग प्रकरणात एक वादग्रस्त व्हिडिओ बनवला होता. या वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यातील आरोपींच्या मदतीने एजाजने पुन्हा एकदा टिकटाॅकवर मुंबई पोलिसांना उद्देशून व्हिडिओ बनवला. त्यात एजाजने टिकटाॅक करणाऱ्या मुलांचे समर्थन करत मुंबई पोलिसांवर टिका केली. त्यामुळेच मुंबईच्या सायबर पोलिसांनी एजाज विरोधात गुन्हा नोंदवून त्याला बुधवारी सकाळी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.हेही वाचा -

दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिजवान कासकरला अटक
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा