रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

मुंबई - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्यावर्षी रेल्वे अर्थसंकल्पात अनारक्षित अंत्योदय एक्स्प्रेस चालवण्याची घोषणा केली होती. नवी टेक्नोलॉजी आणि सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण अशी ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत येत आहे.

रेल्वेचा प्रवास म्हणजे गर्दी, इच्छितस्थळी जाण्यासाठी लागणारा वेळ, सुरक्षा. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारा पण नकोसा प्रवास आत रेल्वेमंत्री सुखकर करणार आहेत. रेल्वे प्रवाशांसाठी अनारक्षित ट्रेन सुरू करत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते टाटानगर अशी ही पहिली अनारक्षित ट्रेन लवकरच धावणार आहे. ही ट्रेन चेन्नईच्या कारखान्यात तयार करण्यात आली. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये प्रवाशांना पाणी पिण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे. आग प्रतिबंधक यंत्र तसेच बायो शौचालय आहेत. शताब्दी, राजधानी एक्स्प्रेससारखे डबे असून एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येते जे सर्वसाधारण रेल्वेत जनरल डब्यात नसते. तसेच आसन व्यवस्था आरामदायक असून प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी ऐसपैस जागा आहे.100 प्रवाशी एका डब्यात आरामशीर बसून जाऊ शकतात. तांत्रिक दृष्ट्या आरामदायक प्रवास आणि अपघात झाल्यास डबे एक दुसऱ्यावर चढणार नाहीत अश्या पद्धतीने बनवण्यात आले आहेत. तूर्तास देशभरात आठ स्थानकावरून एप्रिल महिन्यात या गाड्या सुरू होणार आहेत. एकूण 54 अश्या अनाआरक्षित ट्रेन सुरू होणार आहेत.

Loading Comments