आर्यन खानच्या कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत आणखी वाढ झाली आहे.

आर्यन खानच्या कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ
SHARES

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत आणखी वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यन खानसह अन्य ७ जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर गुरूवारी आर्यनसह इतर आरोपींना सर्व व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. सुनावणीवेळी न्यायालयानं आर्यनची कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आर्यनचा आणखी १० दिवस मुक्काम तुरुंगातच राहणार आहे.

१४ दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या आर्यनला आणखी काही दिवस आर्थर रोडमध्ये राहावं लागणार आहे. मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयानं फेटाळला. या निर्णयाला आर्यनच्या वकिलांकडून हायकोर्टात आव्हान दिलं गेलं. यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे.

आर्यनच्या वकिलांकडे ३० ॲाक्टोबर पर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर १२ दिवस कोर्टाला दिवाळीची सुटी असणार आहे. जर या ७ दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टानं आपला निर्णय दिला नाही तर, आर्यन खानला दिवाळीमध्येही जेलमध्येच रहावे लागेल. कोर्टात एनसीबीने आर्यनचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीयाशी असल्याचा आरोप करत एनडीपीएस अॅक्टच्या कलम २९ अ अंतर्गत आर्यनच्या जामीनाला विरोध केला जो कोर्टाने मान्य केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा