आर्यन खानची हायकोर्टात याचिका, केली 'ही' मागणी

सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे.

आर्यन खानची हायकोर्टात याचिका, केली 'ही' मागणी
SHARES

कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आलेला सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी हायकोर्टानं जामीनासाठी घातलेल्या काही अटींची शिथिलता आणावी, अशी मागणी आर्यनकडून या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

विशेष न्यायालयाच्या अटीनुसार, आर्यनला एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हजेरी लावणं बंधनकारक आहे. प्रामुख्यानं त्या अटीमध्ये शिथिलता आणण्याची मागणी आर्यनकडून या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया आलिशान क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आणि अन्य २० जणांना अटक करण्यात आली होती.

आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचाच्यावतीनं सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी २८ ऑक्टोबर रोजी कठोर अटीशर्तींसह या तिघांना जामीन मंजूर केला.

सदर प्रकरणाचा तपास हा आता एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे आताआर्यनच्या एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयातील हजेरीत शिथिलता आणावी. तसंच पोलीस आरोपींवर अरेरावी करत असल्याचा दावाही आर्याननं या अर्जातून केला आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या अटीत शिथिलता आणण्याची मागणी या अर्जातून करण्यात आली आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.हेही वाचा

मुंबई विमानतळावर २४७ कोटींचे ३५ किलो हेरॉइन जप्त

ऐकावे ते नवलंच! मेंदू हॅक होत असल्याची तक्रार, सायबर पोलिसही चक्रावले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा