ऐकावे ते नवलंच! मेंदू हॅक होत असल्याची तक्रार, सायबर पोलिसही चक्रावले

मागील काही दिवसांपासून अशाच प्रकारच्या माइंड हॅकिंगच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्यानं सायबर पोलिस चक्रावले आहेत.

ऐकावे ते नवलंच! मेंदू हॅक होत असल्याची तक्रार, सायबर पोलिसही चक्रावले
SHARES

आतापर्यंत आपण मोबाईल किंवा अकाऊंट हॅक होतात हे ऐकलं असेल. आपल्यासोबत असं कधी तरी असं घडलंही असेल. पण तुम्ही कधी मेंदू हॅक केल्याचं ऐकलं आहे का? ऐकायला विचित्र वाटत असलं तरी पुण्यात एका महिलेनं मेंदू हॅक केल्याची तक्रार केली आहे. दिव्य मराठीनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.   

पुण्यातील ३८ वर्षीय महिलेस तिचा मेंदू कोणीतरी हॅक केल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे केल्याची तक्रार केली आहे. एका नामांकित लष्करी महाविद्यालयात ही महिला प्राध्यापिका म्हणून काम करते. या महिलेनुसार,  तिच्या मनात जे विचार येतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कृती घडत आहेत. मात्र, पोलिसांनी तिची समजूत काढली.

अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाला देखील असाच काहीसा अनुभव आला. या तरुणाची पबजी गेम खेळताना ऑनलाइन एका तरुणीशी ओळख झाली. २ महिने संपर्कात राहिल्यानंतर तिच्याशी बोलणं बंद झालं.

पण त्यानंतर त्या तरुणीला काही सांगायचं असल्यास ती मोबाइलवर पॉप करून गाणी पाठवते, तिचा फोटो मोबाइल स्क्रीनवर सातत्याने दिसतो, ती वारंवार त्रास देते असे भास तरुणाला होऊ लागले आणि त्याने याबाबत पोलिसांकडे धाव घेत याचा तपास करा अशी मागणी लावून धरली.

तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याचा फोन, फेसबुक तपासून पाहिला. पण तो हॅक झाल्याचं आढळलं नाही.

मानसशास्त्रामध्ये व्यक्तीच्या अविवेकी विचारांशी संबंधित भ्रम (डेल्युजन) हा प्रकार असतो. त्यामध्ये स्वतःच्या परिवारातील ओळखीचे लोक, शेजारी, सोसायटीमधील लोक किंवा त्याच्याशी संबंधित असणारे लोक त्याला कोणत्या ना कोणत्या कारणानं इजा पोहोचविण्याचा किंवा मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत असे भास होऊ लागतात, असं प्रा. चेतन दिवाण यांनी दिव्य मराठीला सांगितलं.

मागील काही दिवसांपासून अशाच प्रकारच्या माइंड हॅकिंगच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्यानं सायबर पोलिस चक्रावले आहेत. पण संबंधित व्यक्तींचे समुपदेशन सायबर पोलिस कर्मचारी, अधिकारी करत आहेत.हेही वाचा

ओमिक्रॉन वेगानं पसरणारा व्हॅरिएंट, पण... - WHO

जगभरात मृत्युदर अत्यंत कमी आहे, नागरिकांनी घाबरून जाऊ नये- आरोग्यमंत्री राजेश टोपे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा