Advertisement

ओमिक्रॉन वेगानं पसरणारा व्हॅरिएंट, पण... - WHO

ओमिक्रॉन या नव्या कोरोना व्हॅरिएंट विषयी जागतिक आरोग्य संघटनेनं मोठी दिलासादायक माहिती दिलीआहे.

ओमिक्रॉन वेगानं पसरणारा व्हॅरिएंट, पण... - WHO
SHARES

ओमिक्रॉन या नव्या कोरोना व्हॅरिएंट विषयी जागतिक आरोग्य संघटनेनं मोठी दिलासादायक माहिती दिलीआहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपातकालीन विभागाचे संचालक मायकेल रियान यांनी करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या घातकतेविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

ते म्हणाले की, “ओमिक्रॉन हा वेगाने प्रसार होणारा व्हेरिएंट आहे. मात्र, याआधी करोनाच्या सापडलेल्या डेल्टासारख्या व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन जास्त घातक आहे हे दर्शवणारी कोणतीही चिन्ह दिसलेली नाहीत. सध्या जगभरात अस्तित्वात असलेल्या करोना लसी या व्हेरिएंटपासून देखील आपला बचाव करू शकतात.”

एएपपी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, “आत्तापर्यंत आलेल्या करोना व्हेरिएंटच्या विरोधात आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या लसी अत्यंत प्रभावी ठरल्या आहेत.”.

पण ओमिक्रॉन घातक दिसत नसला, तरी यासंदर्भात अधिक सखोल अभ्यास आवश्यक असल्याचं मायकेल यांनी स्पष्ट केलं आहे. “ओमिक्रॉनवर नेमके उपचार कसे करावेत, याविषयी सविस्तर माहिती मिळण्यासाठी अधिक सखोल अभ्यास आणि संशोधन आवश्यक आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा

ओमिक्रॉनचा धोका 'असा' टाळता येईल, आफ्रिकेतील डॉक्टरांची महत्त्वपूर्ण माहिती

आदित्य ठाकरेंचं आरोग्यमंत्र्यांना पत्र, लसीकरणासंदर्भात 'या' केल्या मागण्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा