Advertisement

ओमिक्रॉनचा धोका 'असा' टाळता येईल, आफ्रिकेतील डॉक्टरांची महत्त्वपूर्ण माहिती

ओमिक्रॉनबद्दल काहीशी दिलासादायक आणि चिंता कमी करणारी माहिती समोर येत आहे.

ओमिक्रॉनचा धोका 'असा' टाळता येईल, आफ्रिकेतील डॉक्टरांची महत्त्वपूर्ण माहिती
SHARES

ओमिक्रॉनबद्दल काहीशी दिलासादायक आणि चिंता कमी करणारी माहिती समोर येत आहे. ओमिक्रॉन जीवघेणा नाही, त्याला घाबरुन जाऊ नका असं डॉ. अँजेलिक कोएत्झी (Angelique Coetzee) यांनी म्हटलं आहे.

दक्षिण आफ्रिकेतील ज्या डॉक्टरांनी ओमिक्रॉन या कोरोनाचा नवा व्हेरियंट शोध लावला त्या टीमपैकी डॉ. अँजेलिक कोएत्झी या एक आहेत.

डॉ. अँजेलिक कोएत्झी म्हणाल्या की, "कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरियंट 'डेल्टा' व्हेरियंटपेक्षा घातक नाही. 'डेल्टा' व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांपेक्षा ओमिक्रॉन बाधितांमध्ये सौम्य लक्षणं आढळतील. लहान मुलांमध्ये ओमायक्रॉन संसर्गाचं प्रमाण हे कमी आहे. टेस्टिंग, लसीकरण आणि बूस्टर डोस तसंच लहान मुलांचं लसीकरण या गोष्टींमुळे भारतातील ओमिक्रॉनचा प्रसार रोखणं शक्य आहे."

डॉ. अँजेलिक कोएत्झी या दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा आहेत. कोएत्झी यांच्या टीमनंच सर्वात आधी कोरोनाचा हा नवा व्हेरियंट शोधून काढला होता. त्या देशातल्या लसीवरील संशोधनाच्या सल्लागार समितीतही त्यांचा समावेश आहे.

सध्या जगभरात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची दहशत आहे. दक्षिण आफ्रिकेतून जगातल्या अनेक देशांमध्ये याचा प्रसार झाला आहे. भारतातही काही राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातही या नव्या व्हेरियंटबाबत सतर्कता बाळगली जात आहे.

कोरोनाचे आतापर्यंत अल्फा, बीटा, डेल्टा हे व्हेरियंट जगानं पाहिले होते. त्यात डेल्टा व्हेरियंटनं सर्वात जास्त धुमाकूळ घातला. जगभरात लसीकरण सुरू झालं आणि कोरोनाच्या या व्हेरियंट्सचा प्रभाव कमी झाला. पण ओमिक्रॉन आला आणि पुन्हा जगासमोर एक आव्हान निर्माण झालं.

शास्त्रज्ञांच्या मते, ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा जीवघेणा नाही. पण असं असलं तरी त्याचा प्रसार हा इतर व्हेरियंट्सपेक्षा वेगानं होतो. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं, लस घेणं आणि सतर्क राहणं महत्वाचं आहे.



हेही वाचा

आदित्य ठाकरेंचं आरोग्यमंत्र्यांना पत्र, लसीकरणासंदर्भात 'या' केल्या मागण्या

लसीकरणासाठी लवकरच होणार कॉल सेंटर्सची स्थापन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा