Advertisement

लसीकरणासाठी लवकरच होणार कॉल सेंटर्सची स्थापन

महाराष्ट्र सरकारनं सर्व जिल्ह्यांमध्ये कॉल सेंटर्स सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

लसीकरणासाठी लवकरच होणार कॉल सेंटर्सची स्थापन
SHARES

महाराष्ट्र सरकारनं “दस्तक ऑन फोन्स”च्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये कॉल सेंटर्स सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ९८ लाख लाभार्थी ज्यांनी त्यांचा दुसरा डोस विलंब केला किंवा चुकला आहे, त्यांना चालना देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

५ डिसेंबरपर्यंत, महाराष्ट्रानं ११.८४ कोटी डोस दिले होते, जे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च लसीकरणाची नोंद करतं. केवळ ४६.४९ टक्के म्हणजे ४.२५ कोटी लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. हे ५१ टक्क्यांच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे, असं ठळकपणे नमूद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात, डिसेंबरपर्यंत ४,८५,४६,६२६ लाभार्थी ज्यांना Covishield चा पहिला डोस देण्यात आला होता त्यांनी त्यांची दुसरी लस घेतलेली नाही. दुसरीकडे, पहिला डोस घेतल्यानंतर १२,६६,२६१ व्यक्तींनी दुसरा डोस चुकवला आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास यांनी जिल्ह्यांना कॉल सेंटर सुरू करण्यास सांगितले. दुसऱ्या डोससाठी थकीत असलेल्यांना पटवून देण्याचा त्यांचा हेतू आहे. व्यास यांचे असे मत आहे की, ज्यांनी लस चुकवली आहे अशांना फोन करणं काही जिल्ह्यांमध्ये फायदेशीर ठरले आहे.

जिल्हानिहाय कॉल-सेंटर महाराष्ट्राच्या आयटी विभागाद्वारे प्रशासित केले जातील. तर फ्रंटलाइन आणि आरोग्य सेवा कर्मचारी कॉल सेंटर चालवतील. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक १३,०३,८१५ लाभार्थ्यांना दुसरा डोस मिळालेला नाही.

त्यापाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागतो. मुंबईत डवळपास ७, २८, ४८१ लाभर्थ्यांना दुसरा डोस मिळालेला नाही.हेही वाचा

परदेशातून मुंबईत आलेले १०० पेक्षा अधिक प्रवासी गायब

माथेरान इथं परदेशी पर्यटकांना प्रवेश नाकारला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा