Advertisement

परदेशातून मुंबईत आलेले १०० पेक्षा अधिक प्रवासी गायब

परदेशातून मुंबईत आलेले १०० पेक्षा अधिक प्रवाशांचा प्रशासनाला पत्ता लागत नाही आहे.

परदेशातून मुंबईत आलेले १०० पेक्षा अधिक प्रवासी गायब
SHARES

परदेशातून मुंबईत आलेले १०० पेक्षा अधिक प्रवाशांचा प्रशासनाला पत्ता लागत नाही आहे.कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असतानाच राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे, हे सगळेच प्रवासी अती धोकादायक देशांमधून मुंबईत आले होते.

महाराष्ट्रात मंगळवारी दुपारपर्यंत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १० झाली आहे. तर ११ संशयित रुग्णांचे सॅम्पल जिनोम सीक्वेन्सिंगला पाठवण्यात आले आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून ठाणे जिल्ह्यात २९५ प्रवासी आले होते. त्यातील १०९ जणांचा काहीच पत्ता लागत नाही. परदेशातून आल्यानंतर त्यांनी आपले मोबाईल क्रमांक आणि पत्ता नमूद केला होता.

परंतु, या सर्वांचे मोबाईल फोन बंद आहेत. त्यांनी दिलेला पत्ता तपासून पाहिला असता तो देखील खोटा निघाला आहे. आता हे लोक जोपर्यंत ट्रेस होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात संक्रमण फैलावण्याची भीती आहे.

महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अती धोकादायक देशांमधून भारतात येणाऱ्या सर्वांना ७ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं जात आहे. या दरम्यान त्यांची दुसऱ्या, पाचव्या आणि आठव्या दिवशी आरटी-पीसीआर टेस्ट घेतली जात आहे.

रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना पुन्हा होम क्वारंटाइन केलं जात आहे. सर्व हाउसिंग सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच लग्न समारंभ आणि सोहळ्यांवर सुद्धा लक्ष ठेवलं जात आहे.



हेही वाचा

RT-PCR सह 'या' चाचण्याही झाल्या स्वस्त, जाणून घ्या नवे दर

मुंबईत ओमिक्रॉनचा शिरकाव, २ रुग्ण आढळले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा