Advertisement

मुंबईत ओमिक्रॉनचा शिरकाव, २ रुग्ण आढळले

डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईत देखील ओमिक्रॉननं शिरकाव केला आहे.

मुंबईत ओमिक्रॉनचा शिरकाव, २ रुग्ण आढळले
SHARES

डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईत देखील ओमिक्रॉननं शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनचे आणखी दोन रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या दहा झाली आहे.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, सोमवारी मुंबईतील दोन जणांना ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता १० झाली आहे.

दक्षिण आफ्रिकातून २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. या व्यक्तीसोबत राहिलेल्या आणि अमेरिकेतून आलेल्या ३६ वर्षीय व्यक्तीलाही ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचं प्रयोगशाळा अहवालातून समोर आलं आहे.

मुंबईत आढळलेल्या दोन्ही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत, हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

शनिवारी डोंबविलीमध्ये ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक रुग्ण आढळला आहे. त्यानंतर आज मुंबईत दोन रुग्ण सापडल्यानं राज्यातील ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या १०वर पोहचली आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमिक्रॉन या विषाणूची लागण झाली आहे. २४ नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या ४४ वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्या दोन मुलींना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.

त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमिक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणं असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.हेही वाचा

मुंबई विमानतळावरील रैपिड RT-PCR चाचणी आता 'इतक्या' रुपयात

परदेशातून आलेल्या प्रवाशांवर महापालिका ठेवणार 'वॉच'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा