Advertisement

मुंबई विमानतळावरील रॅपिड RT-PCR चाचणी आता 'इतक्या' रुपयात

आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक असलेल्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे.

मुंबई विमानतळावरील रॅपिड RT-PCR चाचणी आता 'इतक्या' रुपयात
SHARES

आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक असलेल्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई विमानतळानं रैपिड RT-PCR चाचणीचे दर कमी केले आहेत. चाचणीचे दर ४,५०० रुपयांवरून ३,९०० रुपये करण्यात आले आहेत. शनिवारपासून नवे दर लागू झाले आहेत.

एमआयएएलनं सांगितलं की, शुक्रवारी ६,७३७ आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानतळावर उतरले. यापैकी ९६९   आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी RT-PCR चाचणी घेतली. त्यापैकी २१४ प्रवाशांनी मानक RT-PCR चाचणी दिली आणि ७५५ प्रवाशांनी जलद पीसीआर चाचणीचा पर्याय निवडला.

युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, झिम्बाब्वे, ब्राझील, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांसारख्या "उच्च धोका" देशांमधून आलेल्या प्रवाशांना प्राधान्यानं बाजूला केलं जातं. त्यानंतर त्यांची पीसीआर चाचणी केली जाते.

दरम्यान, महाराष्ट्रासह मुंबईकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानियातून मुंबईतील धारावीत आलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

टांझानिया हा देश जोखमीच्या देशांपैकी नसला तरी या व्यक्तीचे नमुने जनकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शिवाय, त्यांच्या निकटच्या संपर्कातील लोकांच्याही चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत परदेशातून आलेले आणखी ६ प्रवासी बाधित आढळल्यानं आता बाधित प्रवाशांची संख्या १९ झाली आहे. त्यांच्या संपर्कातील ६ जण बाधित असल्याचं आढळलं आहे.

नव्यानं बाधित आढळलेल्या प्रवाशांपैकी ३ दक्षिण आफ्रिकेहून, १ मॉरिशस तर उर्वरित युरोप आणि ब्रिटनमधून आले आहेत. अशा एकूण २५ जणांची नमुने जनुकीय तपासणीसाठी दिल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.

सध्या धारावीत दररोज १ ते २ नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तर अनेकदा दैनंदिन रुग्णांची संख्या शून्य असते. उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी कमी होत असून सध्या केवळ ५ रुग्ण उपचाराधीन आहेत.हेही वाचा

टांझानियातून आलेला धारावीतील एक रुग्ण रुग्णालयात दाखल

परदेशातून आलेल्या प्रवाशांवर महापालिका ठेवणार 'वॉच'

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा